Download App

144 लावा नाहीतर 145, जीवाला धोका झाला तर गाठ मराठ्यांसोबत, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil :  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) गेल्या दोन महिन्यापासून

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil :  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) गेल्या दोन महिन्यापासून राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. या प्रकरणात अजूनही आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) फरार असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. लवकरात लवकर न्याय मिळावा या मागणीसाठी मस्साजोगच्या (Massajog) ग्रामस्थांनी आता अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. आज या आंदोलनाला मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सर्मथन देत सरकारला इशारा दिला आहे.

यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, उपोषणकर्त्यांच्या जीवाला धोका झाला तर गाठ मराठ्यांसोबत आहे. इथे जर काही झालं तर ती जबाबदारी गावकऱ्यांची नाही. तुम्ही 144 लावा किंवा 145 लावा, तुमच्या हातात सत्ता आल्यावर तुम्ही लोकशाही मारुन टाकणार का?  हत्या झाली आहे, तुम्ही म्हणतात एकालाही सोडणार नाही पण तुम्ही आतापर्यंत नेमकं कोणाला धरलं? ते आधी आम्हाला सांगा, जे अटक झाले आहे, ते स्वत:हून आले आहेत. असं यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, तुमचं सरकार असूनही,कुटुंबीयांना उपोषणावर बसण्याची वेळ येत आहे. हे गंभीर बाब आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस गोड बोलून देशमुख  कुटुंबीयांना वेठीस धरु शकत नाही. तूमच्या राजकीय हेतूसाठी देशमुख कुटुंबीयांचा दुसऱ्यांदा बळी घेऊ नका, अजुनही चाटेचा मोबाईल सापडलेला नाही. असेही जरांगे पाटील म्हणाले.

मोठी बातमी! राज्यात पुन्हा 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

तसेच जर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं असतं तर बीडचं अर्ध जल भरलं असतं. महाराष्ट्रातलं पहिलं कुटुंब आहे, ज्यांनी न्यायासाठी दुसऱ्याचे उंबरठे झिजवले. सरकारने चुका केल्या, तुम्ही न्याय देऊ शकत नाही. असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तर दुसरीकडे या प्रकरणात विरोधक राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.

follow us