Download App

Breaking! 9 तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडीच्या कार्यालयाबाहेर…

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अखेर ईडीच्या कार्यालयातून हसत-हसत बाहेर पडल्याचं दिसून आलं आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी त्यांना ईडीकडून चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ते आज ईडीच्या कार्यालयात सकाळी दाखल झाले होते. तब्बल 9 तास चौकशी केल्यानंतर ते ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले आहेत.

IIM मध्ये शिकला, मोठ्या पॅकेजची ऑफर धुडकावली; शहीद वडिलांचे स्वप्न पूर्ण करत मुलगा सैन्यात अधिकारी

जयंत पाटील ईडीच्या कार्यालयाबाहेर आले असून ईडीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. आज सकाळपासूनच राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालायाबाहेर दाखल झाले होते. जयंत पाटलांना ईडी कार्यालयात बोलवल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याचं देखील दिसून आलं.

‘गंदी बात’ फेम अभिनेता Aditya Singh Rajput याचा मृत्यू, बाथरुमध्ये आढळला मृतदेह

मात्र, जयंत पाटील ईडीच्या कार्यालयाबाहेर येताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे. कार्यकर्त्यांकडून जयंत पाटलांचं स्वागत करण्यात आलं आहे. पाटील बाहेर येताच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला आहे.
राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज मुंबईत दाखल झाले होते. विशेषत: सांगलीच्या इस्लामपूरा भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत.

Jayant Patil यांची आज ईडी चौकशी : राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक

ईडीच्या कार्यालयाबाहेर येताच जयंत पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळत आहे. गोंधळ करु नका, गडबड करु नका, असं आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना जयंत पाटलांकडून करण्यात आलं आहे.तसेच राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेरही मोठी गर्दी झाली आहे.

या प्रकरणी शरद पवारांनीही भाष्य केलं होतं. सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अपेक्षा असण्याची शक्यता आहे, सत्ताधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्याची आमची तयारी नसून यामध्ये आम्हाला होतील त्या यातना सहन करण्यास आम्ही तयार असल्याचं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं. तसेच राज्यात तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केली होती.

Tags

follow us