कर्नाटक निवडणुकीच्या निकालावरुन भाजपची देशात किती लोकप्रियता आहे, हे स्पष्ट झालं असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. दरम्यान, आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.
तुम्ही सांगा…मी पद सोडतो, वर्षभरासाठी घरही सोडतो; जे. पी. नड्डांसमोरच फडणवीसांची कार्यकर्त्यांना ऑफर
जयंत पाटील म्हणाले, कर्नाटक निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकूण 9 उमेदवार होते. त्यापैकी अनेकांना चांगली मते पडली आहे. कर्नाटकात दहा दिवसांच्या प्रचारावर राष्ट्रवादीचा एवढी मते मिळाली आहेत. पण देशात भाजपच किती लोकप्रिय आहे, हे कर्नाटकच्या निकालावरुन समजलं असल्याचं ते म्हणाले आहेत.
कार्यकारिणी भाजपची, चर्चा मात्र पोलीस अधिकाऱ्याच्या फिल्डिंगची…
तसेच आमचा राष्ट्रवादी पक्ष हुकुमशाहीचा नाही. भाजप हा हुकुमशाही असलेला पक्ष आहे. त्यामुळे कर्नाटकातल्या जनतेच्या मनात जो काही रोष होता तो रोष जनतेने मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिला आहे. त्यामुळे आता भाजपची लोकप्रियता राहिलेली नसल्याचं ते म्हणाले आहेत.
Chief Minister of Karnataka : वकील ते मुख्यमंत्री! जाणून घेऊया सिद्धरामय्यांची राजकीय कारकीर्द
यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटावरही निशाणा साधत त्यांचे आमदार निवडून येतीलच असं वाटत नसल्याचं ते म्हणाले आहेत. कर्नाटकात जे लोकं काँग्रेसला सोडून गेले आहेत. एकूण 16 लोकं काँग्रेस सोडून भाजपात गेले होते. त्यापैकी 14 लोक पराभूत झाले असून महाराष्ट्रातील ज्या लोकांनी पक्ष सोडला आहे तेही असेच पराभूत होणार असल्याचा टोलाही त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना लगावला आहे.
अजितदादांचा फोटो भाजपच्या बॅनरवर लावणाऱ्या ‘त्या’ नेत्याची हकालपट्टी
दरम्यान, देशात भाजपची लोकप्रियता आता राहिलेली नसून भारतातल्या लोकशाही मार्गाने निवडून आलेलं 9 राज्यांचं सरकार पाडण्याचं काम भाजपने केलं असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
कर्नाटक निवडणुकीनंतर राज्यातही आता निवडणुकीचे वारं वाहु लागलं असून त्यानूसार सर्वच पक्षांच्या नेत्यांची रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर लगेचच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मुंबई दौरा करीत आढावा घेतला आहे.