Jitendra Awad On Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) आरोप प्रत्यारोप सुरू आहे. राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार या मुद्यावरून देखील सध्या राज्यात राजकारण तापलं आहे. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका करत शरद पवार (Sharad Pawar) उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणार अशी टीका केली होती. तसेच या कार्यक्रमात बोलताना सध्या शरद पवार यांच्या मनात काय सुरु आहे याबाबत त्यांनी अंदाज व्यक्त केला होता.
तर शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी यावरुन देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिला आहे. शरद पवारांच्या मनात काय आहे हे त्यांच्या बायकोला उभ्या महाराष्ट्राला माहिती नसते तर देवेंद्रंना काय माहिती असणार असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लावला.
गणेशोत्सव निमित्त मी मुख्यमंत्री यांच्या घरी आलो होते. त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही कारण त्यांच्या घरात गर्दी खूप होती असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. तसेच सुप्रिया ताईंचे तसे वक्तव्य नव्हते, त्या असं कधीच बोलत नाही, पत्रकारांनी चुकीची माहिती दिली आमचे वैचारीक मतभेद आहेत पण मैत्री आहेत असेही यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?
एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा आणि तो आपला असावा यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे ते तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्याबरोबर देखील चर्चा केली पण बैठकीचे फोटो काढण्यास परवानगी दिली नाही.
दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातात काहीच लागले नाही आणि आता तर शरद पवार यांनी देखील स्पष्ट केले आहे की, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार नाही. नाना पटोले यांनी पण तीच री ओढली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनात जे आहे, ते घडताना दिसत नाही.
Pooja Khedkar : केंद्र सरकारची मोठी कारवाई, पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ
शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे आहेत त्यात उद्धव ठाकरे यांचा चेहरा नक्कीच नाही. असं एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.