“आमच्या वर्गात आम्ही तीघेजण एकाच बाकावर बसायचो. एकाचे नाव केनिथ स्टार, दुस-याचे नाव रविश नॉर्वेल आणि तिसरा मी. आमच्या तिघांची एकदम घट्ट मैत्री होती.” असा लहापणीच्या मैत्रीचा किस्सा जितेंद्र आव्हाड यांनी आज सांगितला आहे. आपल्या ट्विटरवरून आपल्या मैत्रीचा किस्सा सांगितला आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी पुढे धर्म, जात, पंथ हे कधिही आमच्या मैत्रीच्या आड आलं नाही. पण, तेव्हा हे कधी डोक्यातच नसायचं. असं देखील लिहलं आहे.
जितेंद्र आव्हाड लिहितात, “आमच्या वर्गात आम्ही तीघेजण एकाच बाकावर बसायचो. एकाचे नाव केनिथ स्टार, दुस-याचे नाव रविश नॉर्वेल आणि तिसरा मी. सेंट जॉन दि बाप्टीस्ट हायस्कुल ही आमची शाळा. आमच्या तिघांची एकदम घट्ट मैत्री होती.”
Sanjay Raut : नागपूरच्या वज्रमूठ सभेत अजित पवारांना डावललं? राऊत स्पष्टच बोलले
आमच्या वर्गात आम्ही तीघेजण एकाच बाकावर बसायचो. एकाचे नाव केनिथ स्टार, दुस-याचे नाव रविश नॉर्वेल आणि तिसरा मी. सेंट जॉन दि बाप्टीस्ट हायस्कुल ही आमची शाळा. आमच्या तिघांची एकदम घट्ट मैत्री होती. आम्ही तीघेच जण पिकनीकला जायचो आणि त्यावेळेस उपवनच्या बाजूला असलेल्या गार्डनमध्ये बसून…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 15, 2023
आम्ही तीघेच जण पिकनीकला जायचो आणि त्यावेळेस उपवनच्या बाजूला असलेल्या गार्डनमध्ये बसून मजामस्ती करायचो आणि डब्बे खायचो. त्या डब्यामध्ये केनिथने काय आणलं आहे किंवा रविशने काय आणलं आहे हा मनात विचारही कधी शिवला नाही. दुपारचे जेवण झालं की, साधारण अंधार पडण्याच्या आत सायकलीवरुन आम्ही तिघेही घरी जायचो. धर्म, जात, पंथ हे कधिही आमच्या मैत्रीच्या आड आलं नाही. पण, तेव्हा हे कधी डोक्यातच नसायचं.
आतामात्र बाहेर बघितल्यावर पूर्वीचे दिवस आठवतात आणि ते दिवस परत येतील का ? हा प्रश्न मनी पडतो. माझा अजून एक मित्र होता, ज्याचे आता लंडनमध्ये मेडीकलक्षेत्रामध्ये खूप मोठे नाव आहे ‘माधव भिडे’. अजूनही आला की, कधीतरी फोन करतो. आमचे बोलणं होतं. पण, ती त्यावेळेसची मैत्री आणि आताची मैत्री यामध्ये माझ्या अंदाजाने तरी खूप फरक पडला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यामध्ये रमेश घागरे या युझर्सने लिहाल आहे की, “गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी, पाहिल्या दोस्ती स्वार्थ नव्हता.. आताची दोस्ती स्वार्थ ,लाचारी, लाळचाटेपणा ,गद्दारी ह्यामुळे कलंकित झालेली आहे.”
गेले ते दिवस
राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी
पाहिल्या दोस्ती स्वार्थ नव्हता..
आताची दोस्ती स्वार्थ ,लाचारी, लाळचाटेपणा ,गद्दारी ह्यामुळे कलंकित झालेली आहे— Ramesh GhagarePatil (@g_ramesh373) April 15, 2023
याशिवाय श्रद्धा मेहता नावाच्या युझर्सने, “शाळा बुडवून तिघेच पिकनिकला… व्वा! हल्ली विधानसभे च्या अधिवेशनाला पण अश्याच दांड्या मारता त्यात नवल नाही.” अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.