Download App

माझे अंघोळ करतानाचे व्हिडिओ…करुणा शर्मांचा आणखी एक खळबळजनक आरोप, प्रकरण नेमकं काय?

Karuna Sharma Filed Another Petition Against Dhananjay Munde : माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे सध्या त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. आता पुन्हा त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयात करुणा शर्मा यांनी (Karuna Sharma) पुन्हा एक याचिका दाखल करत मोठी मागणी केल्याचं समोर आलंय.

धनंजय मुंडे यांची संपत्ती जवळपास पाच हजार कोटी रूपयांची आहे. त्यासंदर्भात याचिका दाखल केल्याचं करुणा शर्मा यांनी केली आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत ही संपत्ती कोणालाही खरेदी, विक्री करता येवू (Beed News) नये. याचिकेत सगळ्या संपत्तीवर स्टे आणण्याची मागणी केली असल्याचं करूणा शर्मा यांनी म्हटलंय. यावेळी बोलताना त्यांनी अनेक गंभीर आरोप केलेत.

काय, तुमच्या पॅनकार्डवर दुसराच कर्ज घेतोय? टेन्शन घेऊ नका; माहिती घ्या, स्टेप बाय स्टेप..

करुणा शर्मा यांनी नेमकं काय म्हटलं?

बांद्रा न्यायालयामध्ये आमची तारीख होती. घरगुती हिंसाचार प्रकरणी आमच्या वकिलांनी तीन याचिका दाखल केल्या आहेत. यामध्ये दोन लाख रूपये देण्याच्या निर्णयासंदर्भातील एक याचिका आहे. न्यायालयाने ज्या दिवशी निकाल दिला. तेव्हापासून मला दिवसरात्र धमक्या दिला जात असून माझे खोटे व्हिडिओ टाकण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. यामध्ये मी नसून तीन वर्षांपूर्वीच यासंदर्भात तक्रार देखील दिलेली आहे.

भारतीय विद्यार्थ्यांचं विमान ऑस्ट्रेलियात, शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाच फेव्हरेट; अमेरिका, कॅनडा पछाडले!

परंतु याप्रकरणी अजून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. ज्या व्हिडिओमध्ये मी नाही, असे खोटे व्हिडिओ पोस्ट करून बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचं देखील करुणा शर्मा यांनी म्हटलेलं आहे. सतत मला धमक्या येत आहेत. माझे अंघोळ करतानाचे व्हिडिओ टाकण्याची देखील धमकी दिली जात आहे. हे लोक दररोज मला माझ्या मुलीला उचलून घेऊन जाण्याची धमकी व्हॉट्सअपवर देत आहेत. कोर्ट केस माघारी घ्या, धनंजय मुंडे यांची आमदारकी वापस घेण्यासंदर्भात दाखल केलेली याचिका मागे घ्या, घरगुती हिंसाचाराची केस मागे घ्या, अशा मागण्या हे लोक करत आहेत. यासाठी मला धमकावलं जातंय. त्यासंदर्भात देखील याचिका दाखल केली असल्याचं करुणा शर्मा यांनी सांगितलं आहे.

माझ्याकडे धनंजय मुंडे यांच्या पाचशे कोटी रूपयांच्या संपत्तीने खरे कागदपत्रे आहेत. त्यांची एकूण पाच हजार कोटी रूपयांची संपत्ती आहे. यासंदर्भात मी आज न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जोपर्यंत आमचा निकाल लागत नाही, तोपर्यंत ही संपत्ती कोणालाही खरेदी-विक्री करता येऊ नये. सगळ्या संपत्तीवर स्टे आणला जावा, अशी मागणी करूणा शर्मा यांनी केली आहे.

 

follow us