Download App

Letsupp Special : 288 शाखा अन् दोन लाख पदाधिकाऱ्यांची फौज; बीआरएसची प्रचंड वेगाने घौडदौड

येत्या वर्षभरात होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीची (BRS) राज्यात प्रचंड वेगाने घौडदौड सुरु आहे. येत्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ महाराष्ट्रात येणार आहे, पंढरपूरमध्ये विठूरायाचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील प्रवेशावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. (KCR and Bharat Rashtra Samiti along with 288 party offices and 2 lakhs workers active in Maharashtra)

तेलंगणा पॅटर्नप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही चांगले दिवस आणू असे म्हणत काही महिन्यांपूर्वी भारत राष्ट्र समितीने नांदेडमार्गे महाराष्ट्रात एन्ट्री घेतली. नांदेडमध्ये भव्य जाहीर सभा घेत माजी आमदारांचे पक्षात प्रवेश घडवून आणले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला सभा पार पडली. यातही माजी आमदार आणि विविध प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रवेश झाले.

सोज्वळपणा सोडा! ठाकरे-फडणवीस वादात बावनकुळेंनी दोन शब्दांत ओतलं तेल

यानंंतरच्या टप्प्यात भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रातील सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधून तेलंगणा पॅटर्न समजावून सांगत महाराष्ट्रात सोबत येण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी गुलाबी झेंडा हाती घेतला. शेतकरी नेते शरद जोशी यांच्यासमवेत काम केलेले माणिक कदम राज्यात बीआरएसचे प्रमुख आहेत. आतापर्यंत भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्रात 2 लाख पदाधिकारी नेमून झाले असून सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये शाखा सुरू झाल्या आहेत.

Nitesh Rane : ‘हिच ती वेळ.. काय ते उद्या बोलू..’ नितेश राणेंच्या ‘त्या’ ट्विटचा रोख कुणाकडे?

याशिवाय महाराष्ट्रातील 2 प्रमुख महानगरांत म्हणजे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाची कार्यालये उघडण्यात आली आहेत. बीआरएसने प्रत्येक कार्यकर्त्याला अ‍ॅपवर जोडून घेतले आहे. टॅबवर या अ‍ॅपची माहिती घेत पक्षाचा विस्तार केला जातो आहे. महाराष्ट्रातील प्रमुख रस्त्यांवर आणि महामार्गांवर भारत राष्ट्र समिती आणि चंद्रशेखर राव यांचे पोस्टर्स दिसून येत आहेत. 288 मतदारसंघांमधून पक्षाच्या गाड्या फिरताना दिसून येत आहेत.

8 माजी आमदार पक्षात दाखल; आणखी 10 लागले गळाला

आतापर्यंत 8 माजी आमदार आणि एका माजी खासदार महोदयांना केसीआर यांनी पक्षाच्या गोटात दाखल करुन घेतलं आहे. नांदेडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवत त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणातही प्रवेश केला आहे. अशात आता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके आणि राज्यातील किमान 10 माजी आमदार भारत राष्ट्र समितीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. या सर्व नेत्यांना पक्षात घेऊन केसीआर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमका करण्याच्या तयारीत आहेत.

यापूर्वी बीआरएसमध्ये दाखल झालेले माजी आमदार, खासदार अन् नेते :

उदगीरचे माजी आमदार मोहन पटवारी
यवतमाळचे माजी आमदार राजू तोडसाम
ठाणे जिल्ह्यातील माजी आमदार दिगंबर भिसे
माजी आमदार हर्षवर्धन जाधव
माजी आमदार शंकर धोंडगे
माजी आमदार नागनाथ घिसेवाड
माजी खासदार हरिभाऊ राठोड
माजी आमदार दीपक आत्राम

Tags

follow us