Palghar News : महाराष्ट्रात चाललंय काय? 10 वर्षीय मुलीचं अपहरण अन् सामुहिक अत्याचार

Palghar News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत चालले आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Palghar News : महाराष्ट्रात चाललंय काय? 10 वर्षीय मुलीचं अपहरण अन् सामुहिक अत्याचार

Palghar News : महाराष्ट्रात चाललंय काय? 10 वर्षीय मुलीचं अपहरण अन् सामुहिक अत्याचार

Palghar News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत चालले आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती. यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महिल्यांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

माहितीनुसार, पालघरमध्ये (Palghar) एका दहा वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना 2 सप्टेंबर रोजी घडली असून गणेशोत्सवानिमित्त गणेशाच्या मूर्तीची मिरवणूक पाहून घरी निघालेल्या या मुलीला दोन तरुणांनी अडवलं, हे दोन्ही तरुण तिला ओळखत होते कारण ते एकाच भागत राहण्यास आहेत. यानंतर दोन्ही तरुणांनी मुलीला निर्जनस्थळी नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला आणि काही काळ तिला डांबून ठेवलं पण मुलगी अद्याप घरी आली नाही म्हणून तिच्या पालकांनी तिचा शोध सुरु केला पण जेव्हा ती रात्री साडेदहा वाजता घरी आली तेव्हा तिच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते आणि प्रायव्हेट पार्टवर रक्ताचे डाग होते.

यानंतर मुलीनं आपल्या सोबत काय काय घडलं हे पालकांना सांगितलं आणि कुणी केलं यांची नावे देखील तिने सांगितले. त्यानंतर पालकांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाणून पॉक्सो अंतर्गत सामुहिक बलात्काराची आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असते संशयीत आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगतिले की, दोन्ही तरुणांचे मोबाईल फोन ट्रॅक करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Axis आणि HDFC बँकेवर मोठी कारवाई, RBI ठोठावला तब्बल 2.91 कोटींचा दंड, जाणून घ्या प्रकरण

सध्या आरोपींनी गुन्हा केला तेव्हा मद्य प्राशन केलं होतं का ? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच दोन्ही तरुण यापूर्वी कोणत्या गुन्ह्यात सामील होत्या का? याचा देखील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

Exit mobile version