वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र अव्वल राहणार, फक्त पालघरला तिसरे विमानतळ उभारा; फडणवीसांची मागणी

वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र अव्वल राहणार, फक्त पालघरला तिसरे विमानतळ उभारा; फडणवीसांची मागणी

Devendra Fadnavis : मुंबई पोर्ट (Mumbai Port) आणि जेएनपीटी पोर्टमुळे (JNPT port) मुंबई आणि हा सर्व भाग देशाची आर्थिक राजधानी बनला. त्यामुळे आपण नंबर वन ठरलो. आता त्यापेक्ष तिप्पट मोठं बंदर वाढवणमध्ये (Wadhavan) होत आहे. या बंदरामुळं पुढील 50 वर्षे महाराष्ट्र नंबर वन राहिल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. याशिवाय, या ठिकाणी तिसरे विमानतळ उभारा, अशी मागणीही त्यांनी पंतप्रधा नरेंद्र मोदींकडे (Prime Minister Narendra Modi केली.

Bigg Boss Marathi: ‘फार हसू येतंय का?’; ‘बिग बॉस’ने घेतली डीपी अन् अंकिताची फिरकी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 30) देशातील सर्वात खोल (20.20 मीटर) वाडवण बंदराचे भूमिपूजन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, मुंबई आणि हा सर्व भाग देशाची आर्थिक राजधानी बनला. कारण मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट इथं आहे. त्यामुळे आपण नंबर वन ठरलो. आता त्यापेक्ष तिप्पट मोठं बंदर वाढवणमध्ये होत आहे. या बंदरामुळं पुढील 50 वर्षे महाराष्ट्र नंबर वन राहिल. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य झालं. 1980 च्या दशकात वाढवण बंदर करण्याचे स्वप्न पाहिले गेले होते. पण, ते 2024 मध्ये प्रत्यक्षात उतरलं. 2014 मध्ये मोदी यांचे सरकार आले आणि कोर्टाच्या नोटिफिकेशनमधून वाढवण बंदर बाहेर आहे. आता वाढवण बंदर सुरू करण्याच्या कामाला वेग आला असून मोदींनी त्याला नॅशनल पोर्टचा दर्जा दिला, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शरद पवारांनी Z+ सुरक्षा नाकारली; बैठकीतून CRPF अधिकारी परतले 

तिसरे विमानतळ झाले तर…
पुढं बोलतांना ते म्हणाले, आता हे बंदर पुढील 200 वर्षे राहील आणि मोदींच नावही राहील. मोदींनी भारताला पुढे नेण्याचे काम केले, असं लोक म्हणतील. येत्या काळात काळात मुंबई वाढणार आहे. वसई विरारमध्ये वाढणार आहे. आपण बंदराचे रिक्लेमेन्शन करणार आहोत. या ठिकाणी एअरपोर्टचेही रिक्लेमेन्शन केले पाहिजे. या ठिकाणी तिसरे विमानतळ झाले तर महाराष्ट्र आणखी पुढे जाईल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

वाढवण परिसरातील एकालाही वाऱ्यावर सोडणार नाही…
दरम्यान, काही स्थानिकांकडून या बंदराला विरोध होत असल्याचं लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भूमिका मांडली. ते म्हणाले, बंदराच्या विस्तारामुळे परिसराचा सर्वांगीण विकास होईल. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. विकासासाठी काही पावले मागे यावे लागेलं. मात्र मी तुम्हाला आश्वासन देतो वाढवण परिसरातील एकाही व्यक्तीला वाऱ्यावर सोडणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube