अजितदादांविषयी अपशब्द; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, मासाळचा माफीनामा अन् आत्मक्लेशचा निर्णय

मासाळ याने अजितदादांचा एकेरी उल्लेख करत संतापजनक वक्तव्य केलं आहे. त्याचा राजीनामा झाला पाहिजे यासाठी गेली दोन-तीन दिवस आम्ही संपर्क करत होतो.

Baramati Mafinama

अगोदर अजितदादांविषयी अपशब्द; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रम, मासाळचा माफीनामा अन् आत्मक्लेशाचा निर्णय

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Baramati) यांच्या मृत्यूबद्दल अत्यंत संवेदनाहिन व बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी अडचणीत आलेला येथील नगरसेवक किशोर मासाळ याच्या अडचणी वाढल्या आहेत. आधी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्याचे अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची कॉल रेकॉर्डिंग समोर आली. पक्षाने यासंबंधी आता कठोर भूमिका घेतली आहे. मासाळ याने नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा पक्षातून हकालपट्टी करू, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष किरण इंगळे व तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी दिला आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विषयी केलेल्या बेताल वक्तव्यामुळं बारामतीत संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने आपली भूमिका जाहीर केली. इंगळे म्हणाले, बारामतीकरांच्या भावना तुम्हाला माहिती आहेत, अशावेळी पक्षाध्यक्ष म्हणून जे करणे अपेक्षित आहे, ते करा, असा सूचना आल्या आहेत. मासाळ याने अजितदादांचा एकेरी उल्लेख करत संतापजनक वक्तव्य केलं आहे. त्याचा राजीनामा झाला पाहिजे यासाठी गेली दोन-तीन दिवस आम्ही संपर्क साधत होतो, असही ते म्हणाले.

मोठी बातमी! नो भुजबळ, नो राणा; राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

राजीनामा दे अशी पक्षाची भूमिका आम्ही त्यांना स्पष्ट सागितली. विचार करण्यासाठी वेळ हवा असे सांगत वेळकाढूपणा केला जात आहे. परंतु, आम्हाला त्याला वेळ द्यायचा नाही. नगरसेवकाच्या राजीनाम्याबाबत काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता करावी लागते. ती कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल. मासाळ याचं दादांवर प्रेम असेल, त्यानी नशेत हा प्रकार केला असेल तर राजीनामा देवून भूमिका मांडायला पाहिजे होती. परंतु, तसे घडलं नाही असंही ते म्हणाले.

दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर,वादाच्या भोवऱ्यात सापडलेला बारामती नगरपालिकेचा नगरसेवक किशोर मासाळ याने अखेर पत्रकार परिषदेत सार्वजनिक माफी मागितली आहे. अनावधानाने आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत समस्त बारामतीकर, अजितदादा पवार यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेची हात जोडून क्षमा मागतो असं तो म्हणाला.

माझ्याकडून गेलेले वक्तव्य पूर्णपणे चुकीचं होतं. त्याबद्दल मला मनस्वी खेद आणि पश्चाताप होत आहे. माझ्या शब्दांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळं मी सर्वांची मनापासून माफी मागतो, असं मासाळ यांनी स्पष्ट केलं. आपण राष्ट्रवादीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत असून नगरसेवक पदाचा मात्र राजीनामा देणार नाही, कारण बारामतीतील जनतेने मला बिनविरोध निवडून दिलं आहे, त्यामुळं कोणाच्याही दबावाखाली आपण नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. आपल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळं अजितदादांच्या स्मृतीस्थळावर दि ९ जून रोजी आत्मकेश म्हणून एक दिवस अन्नत्याग करून बसणार असल्याचही त्याने यावेळी स्पष्ट केलं.

Exit mobile version