मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच डी.के. शिवकुमारांना धक्का, मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा
सिद्धरामय्या यांच्याजागी आता डी.के.शिवकुमार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची ३ जून रोजी शपथ घेतली. यावेळी १२ जणांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली.
कर्नाटकच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. सिद्धरामय्या यांच्याजागी आता डी.के.शिवकुमार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची ३ जून रोजी शपथ घेतली. यावेळी १२ जणांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली. मात्र, शपथविधीनंतर दोन दिवसांतच कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा मोठ्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं आहे. सरकारमधील कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.