Karnatak : सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरुन पायउतार, डी.के. शिवकुमार होणार नवे CM

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आज त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलायं.

Untitle (60)

Karnatak : कॉंग्रेसच्या ठरलेल्या अडीच वर्षांच्या फॉर्मुल्यानुसार आणि हाय कमांडच्या आदेशानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Sidharamayya) यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत खुद्द सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलंय. सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर आता कर्नाटक कॉंग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार (D.K. Shivkumar) नवे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालंय.

रुपाली चाकणकरांची भूमिका करू नका; दीपाली सय्यद यांना धमक्यांचे फोन, राजकीय दबावाचा गंभीर आरोप

2023 च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आली. काँग्रेसची सत्ता आल्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार? याची उत्सुकता लागलेली असतानाच त्याचवेळी हाय कमांडच्या आदेशाने अडीच-अडीच वर्षांचा फॉर्मुला ठरला. सुरुवातीचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या असतील त्यानंतर डी.के. शिवकुमार हे मुख्यमंत्री होतील, असा फॉर्मुला ठरला होता. आता त्याच फॉर्मुल्यानुसार काँग्रेस हायकमांडच्या आदेशानंतर सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिला असून पुढील मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार होणार आहेत.

अहमदाबादमध्ये आढळला इबोलाचा संशयित रुग्ण; मुंबई, दमण, सिल्व्हासा प्रवासाने वाढवली धास्ती

सिद्धरामय्या यांनी राजीनामा देण्याआधी कर्नाटक काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पक्षात राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन अंतर्गत कलह झाल्याचं ऐकायला मिळालं. मात्र, आज सकाळच्या मिटींगमध्ये सिद्धरामय्या आणि डी.के.शिवकुमार या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर काँग्रेस हायकमांडचा निर्णय सिद्धरामय्या यांनी मान्य केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडणं सोपं नसतं, मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर माणूस जास्तीतजास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी सिद्धरामय्या यांनी प्रयत्न केले मात्र, ते अयशस्वी ठरले. अखेर हा राजीनामा झाला असून डी.के शिवकुमार मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब झालंय.

लाखोंचा खर्च! बोहल्यावर चढण्याआधीच PSI नवरदेवाचा लग्नास नकार; बीडमध्ये काय घडलं?

डी.के. शिवकुमार मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असून 1980 पासून ते कर्नाटकात काँग्रेसचे सक्रिय नेते आहेत. आत्तापर्यंत त्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदापासून ते ऊर्जामंत्री, जलसंधारण खात्याचे ते मंत्री होते. 2023 साली कर्नाटकात झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण विजयात डी.के. शिवकुमार यांची महत्वाची भूमिका राहिलेली असून संकटकाळात सर्व नेत्यांना एकत्रित घेऊन त्यांचं सरकार स्थापन करण्यात मोठं योगदान आहे.

follow us