ठाणे विधान परिषदेसाठी राजकारण तापले; किंगमेकर बविआच्या मतांसाठी शिंदे अन् भाजपची धडपड
Thane Legislative Council उपमुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यात भाजपने जोरदार ताकद लावली आहे. यात आता बविआने आपला राजकीय भाव वाढवला आहे.
Politics heats up for Thane Legislative Council Shinde and BJP struggle for Kingmaker BVA votes : राज्यामध्ये सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये ठाण्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील वर्चस्वाची लढाई अधिक तीव्र होताना दिसत आहे.
चुकीचा सॅनिटरी पॅड वापरताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात भाजपनेही जोरदार ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही पक्षांकडून स्वबळाची भाषा केली जात असताना, या संघर्षात आता बहुजन विकास आघाडी म्हणजेच बविआने आपला राजकीय भाव वाढवल्याची चर्चा रंगू लागली आहे.
NEET Exam Paper leak : आता पेपर फुटूच शकत नाही…प्रश्नपत्रिकेच्या संरक्षणाची जबाबदारी सैन्याकडे?
ठाण्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून, महायुतीतच अंतर्गत संघर्ष उफाळून येत असल्याचे चित्र आहे. भाजपकडून ठाणे महापालिकेवर दावा मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू आहेत, तर शिंदे गटही आपला गड कायम राखण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक बैठका, बॅनरबाजी, आरोप-प्रत्यारोप आणि स्वबळाच्या घोषणा यामुळे राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.
‘tukaram_ias’ इंस्टाग्राम अकाउंटवर पाठवा माहिती; भेसळखोरांवर होणार थेट कारवाई
याच पार्श्वभूमीवर बविआनेही आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. ठाणे आणि परिसरातील काही मतदारसंघांमध्ये बविआची असलेली पकड महायुतीतील दोन्ही मोठ्या पक्षांसाठी महत्त्वाची ठरू शकते. कारण ठाण्यामध्ये शिंदे आणि भाजपनंतर बविआकडे जास्त म्हणजे 70 मतं आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोघांनाही बविआचा पाठिंबा महत्त्वाचा वाटत आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून हाा पाठिंबा मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली! तांत्रिक बिघाडामुळे मोठा निर्णय
दरम्यान, ठाणे महापालिकेत याआधीही भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष अनेकदा उघडपणे समोर आला आहे. महासभांमधील वाद, विकासकामांवरील आरोप आणि निधी वाटपावरून दोन्ही पक्ष आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील ही राजकीय लढाई आणखी रंगणार असून, बविआची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.