मोठी बातमी! नो भुजबळ, नो राणा… राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ नव्हे तर राजेंद्र जैन यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

News Photo   2026 06 07T221323.899

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ (NCP) नव्हे तर राजेंद्र जैन यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.  सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या जागेवर कुणाला संधी द्यायची याबाबत राष्ट्रवादीत चर्चा होती. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा होती. मात्र, आता राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली आहे.

भुजबळांच्या अटी अमान्य ?

छगन भुजबळ हे दिल्लीला गेल्यावर येवला विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त होणार. या रिक्त जागेवर पुतण्या समीर भुजबळ यांना संधी देण्यात यावी व माझे मंत्रिपद त्यांना द्यावी, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली होती. समीर भुजबळ यांना आमदारकी मिळेल असं बोललं जोत होतं. परंतु मंत्रिपद मिळण्याबाबत शंका उपस्थित केली होती. आता या मुद्द्यावर भुजबळांबरोबर तडतोड झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

माजी खासदार नवनीत राणा यांनी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेट घेतली होती. त्यांचा फोटोही त्यांनी फेसबुकवर टाकला  होता. त्यामुळे नवनीत राणा यांचे नाव जाहीर होईल, असंही बोलले जात होतं. परंतु तटकरे यांनी राणा या उमेदवार नसतील, असं जाहीर केलं होतं. राज्यसभेचा उमेदवार फायनल करण्याबाबत कोअर कमिटीची बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी झाल्यानंतर होईल असं सांगितलं होतं.

कोण आहेत राजेंद्र जैन?

राजेंद्र जैन मूळचे विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील आहेत.त्यांनी यापूर्वी विधान परिषदेचे आमदार म्हणूनही काम पाहिले आहे. ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून राजेंद्र जैन यांच्याकडं पाहिलं जातं. प्रफुल पटेल यांनी राजेंद्र जैन यांच्या तिकीटासाठी जोर लावल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जातं आहे.

follow us