Site icon Letsupp | मराठी बातम्या, ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज | Marathi News Online

बाप रे! मिरवणुतील लेसर लाईटमुळे तरुणाच्या डोळ्याला दुखापत, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

Kolhapur News

Kolhapur News

Kolhapur News : गेल्या दोन वर्षांत मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या धोकादायक लेसर किरणांमुळे (Laser rays) डोळ्यांना इजा झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता कोल्हापूरातूनही (Kolhapur) अशीच एक घटना समोर आली. उचगावमध्ये गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेझर लाईटच्या किरणांमुळे मिरवणुकीतील एका तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयात (Shastri Nagar Hospital) उपचार करण्यात आले.

अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकरण, 71 वर्षाच्या वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या 

उचलगाव येथे लाडक्या गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. येथील गणेश मंडळांनी डीजेच्या दणदणाटात गणरायाचे स्वागत केले. दरम्यान, लेझर लाइटचा वापर टाळा असं आवाहन करूनही काही मंडळांनी मिरवणुकीत मोठमोठे एलईडी लाईट आणि लेझर लाईटचा वापर केला. या लेझर लाइटांमुळे मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाच्या डोळ्याला इजा झाली. आदित्य पांडुरंग बोडके (21 वर्ष) असं जमखी तरुणाचे नाव आहे.

महाविकास आघाडीत चौथा भिडू? एमआयएमकडून प्रस्तावाबरोबर अल्टिमेटमही… 

लेझर लाईटची प्रखर किरणे थेट डोळ्यांवर पडल्याने या तरुणाचा डोळा लाल झाला. त्यातून पाणी वाहू लागल्यानंतर त्याला शास्त्रीनगर येथील रुग्णालयात आणले असता त्याच्या बुबुळाला या किरणांमुळे इजा होऊन आत रक्तस्त्राव झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

तर दुसरीकडे बलाईवाडीत बंदोबस्ताला असणारे हवालदार युवराज पाटील यांच्याही डोळ्याला लेसरमुळे त्रास जाणवू लागला. त्यांच्याही डोळ्याला लेसर किरणांमुळे इजा झाल्याचं सांगण्यात येत आहे. युवराज पाटील यांचा डोळा लाल होऊन सूज आल्याने त्यांनाही उपचारासाठी नेण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

दरम्यान, यापूर्वीही अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. या लेसर लाईटकडे एकटक पाहत राहिल्याने डोळ्यांना त्रास होता. त्यामुळं लेझर लाईट्सच्या वापर करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन यावर काही कारवाई करणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Exit mobile version