Kolhapur Police Arrest Prashant Koratkar In Telangana : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशांत कोरटकर फरार होता. त्याला तेलंगणातून बेड्या ठोकल्याची माहिती समोर आलीय. यासंदर्भात लवकरच कोल्हापूर पोलीस माहिती देण्याची शक्यता आहे.
शिवरायांचा अपमान, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी (Indrajeet Sawant) असे अनेक आरोप प्रशांत कोरटकरवर आहेत. दरम्यान त्याला अटक झाल्याची माहिती गृहविभागातून मिळत आहे. प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला (Kolhapur Police Arrest Prashant Koratkar) होता. परंतु न्यायालयाने तो अर्ज फेटाळला होता. मागील 25 फेब्रुवारीपासून कोरटकर फरार होता, अखेर आज त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.
कुणाल कामराने संविधान दाखवले, पण या पुस्तकातील नियम काय सांगतात?, काय योग्य काय अयोग्य?
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेला नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर हा परदेशी पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात होता. अखेर कोरटकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दिलासा नाही
कोल्हापूर न्यायालयामध्ये प्रशांत कोरटकरने आधी जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु कोल्हापूर न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. प्रशांत कोरटकर याला अटक कारवाईपासून अंतरिम संरक्षणाचा तातडीचा दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. तसेच त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी ठेवली होती. न्या. राजेश पाटील यांच्यासमोर याविषयी प्राथमिक सुनावणी झाली. तेव्हा, अर्जाची प्रतच अद्याप मिळाली नसल्याचे सरकारी वकिलांनी सांगितलं होतं. न्यायमूर्तींनी अर्जावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली. तसंच, तोपर्यंत कोरटकर याला कोणतेही संरक्षण देण्यास नकार दिला होता.
तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा का? एमएसएमईची व्याख्या बदलली, 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार…
मागील काही दिवसांपासून पोलीस कोरटकरचा शोध घेत होते. परंतु तो पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात देखील आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध सुरू होते. अखेर कोरटकरला पोलिसांनी तेलंगणातून अटक केल्याची माहिती समोर आली आहे.