Chhatrapati Shivaji Maharaj : याद राखा, शिवरायांचा अवमान झाला तर गाठ आमच्याशी….; अभिषक कळमकर संतापले
अहमदनगर – रत्नागिरी राजकोट येथे आठ महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाच दिवसापूर्वी अचानक कोसळला. या पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर शहरात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मोर्चा काढला. यावेळी महायुतीचे सरकार शिवद्रोही आहे, असा आरोप करत शिवरायांचा अवमान झाल्यास गाठ महाविकास आघाडीशी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
‘लय पवार घरी यायला लागले आहेत, मात्र …’, बारामतीकरांना अजित पवारांची साद
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. नगरमध्येही महाविकास आघाडीने महायुती सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन दिल्लीगेट या ठिकाणी केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस महाविकास आघाडीच्यावतीने जोडे मारू आंदोलन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत, त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत मविआच्या कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या.
शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्राचे धडाकेबाज निर्णय; 14 हजार कोटी मंजूर
यावेळी बोलतांना अभिषेक कळमकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्र तसेच शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. हे महायुती सरकार शिवद्रोही आहे. ते वाऱ्याने पुतळा कोसळला असं सांगतात. पण यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याचं पाप महायुती सरकारने वारंवार केलं. आता शिवरायांचा अपमान झाल्यास गाठ महाविकास आघाडीशी आहे, अशा शब्दात कळमकर यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.