Ajit Pawar on Uddhav Thackeray : काही लोक विकासात राजकारण करतात. मोठे मोठे प्रकल्प रायगडच्या (Raigad) भागात आणताना काहींनी विरोध केला. मला त्या लोकांचे कळत नाही, या भागातील अर्थव्यवस्था बदलण्यासाठी, आर्थिक सुबत्ता येण्यासाठी, चांगले प्रकल्प येत असतील, तरुणांना रोजगार मिळणार असेल तर बाकीच्यांनी विरोध करण्याचे काय कारण आहे? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ठाकरे गटावर टीका केली.
ते पुढं म्हणाले की रायगड जिल्हा मुंबईच्या जवळ असणारा जिल्हा आहे. आता तिसरी मुंबई रायगड भागात विकसित होत आहे. त्यासाठी उरण ते शिवडी असा सागरी मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला सुरु करत आहेत. यामुळे मुंबईपासून अवघ्या 15 मिनिटांवर रायगड जिल्हा येतो आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ या भागात होत आहे. त्यामुळे राजगड जिल्ह्यात अधिकाधिक विकासाच्या संधी येणार आहेत, असे त्यांनी म्हटले.
‘तेव्हा कोल्हे भेकडासारखे पळून गेले होते…’, अजित पवार गटाची अमोल कोल्हेंवर घणाघाती टीका
रायगड जिल्ह्याला निसर्गाची देणं लागलेली आहे. चांगला समुद्र किनारा आहे, डोंगराळ भाग आहे, जंजिऱ्यासह अभेद्य किल्ले लाभले आहेत. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातील लोक येत असतात. यासाठी आपल्या बापजाद्यांची ठेव असलेल्या जामीनी विकू नका. बाहेरचे लोक येऊन पाहिजे तेवढे पैसे देतील. एकदा आपण काळ्या आईला मुकलो तर मग आपले काही खरे नाही. त्यामुळे
आहे त्या जमीनीत काहीतरी उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीचे छापे, आव्हाड म्हणाले, ‘आपलेच घरभेदी सहकारी सामील’
राज्य सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रम आज राजगड जिल्ह्यातील लोणेरे येथे संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित होते.