बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्य सरकारने जबरदस्ती केल्यास लोकं ऐकणार नाहीत, लोकांशी चर्चा करुनच मार्ग काढा, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. आज शरद पवारांनी पंढरपूर येथून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
The Kerala Story : नाहीतर तुझीही कन्हैयालाल सारखी परिस्थिती करु, रिक्षाचालकाला धमकी
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात विकासाचे प्रकल्प येत असतील तर अशा प्रकल्पांचं स्वागतच केलं पाहिजे. पण स्थानिक नागरिकांची नाराजी दुर्लक्षित करण्यात येऊ शकत नाही. या प्रकल्पाबद्दल राज्य सरकारकडून पोलिसांचा वापर करणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले आहेत.
‘बारसूत यायला वेळ नाही पण कानडी आप्पांचे भांडी घासायला गेलेत’
तसेच राज्य सरकारने बारसूमधील शेतकऱ्यांशी संवाद साधून चर्चेअंती मार्ग काढण्यात येऊ शकतो. सरकारने जबरदस्ती केल्यास भूमिपुत्र तुमचं ऐकणार नाहीत, प्रकल्प आम्हाला नको, असा पवित्रा ते घेतील, अशीही शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कृतीने मराठी मन दुखावले; रोहित पवारांचा शिंदेंवर हल्लाबोल
दरम्यान, राज्य सरकारने पर्यावरणाच्या दृष्टीने असे प्रकल्प आणायचे की नाही, याबाबत विचार करायला हवा, तसेच बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुनच निर्णय झाला पाहिजे, असं मत शरद पवारांनी स्पष्ट केलंय.
काही दिवसांपासून बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु आहे. राज्य सरकारकडून सर्वेक्षणासाठी कारवाई करण्यात आल्यानंतर प्रकल्पाविरोधात बारसूमधल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यावरुन सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी चांगलचं धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं.