The Kerala Story : नाहीतर तुझीही कन्हैयालाल सारखी परिस्थिती करु, रिक्षाचालकाला धमकी
The Kerala Story : पुण्यातल्या एका रिक्षा चालकाला काही कट्टरपंथीयांकडून धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट पाहण्यासाठी रिक्षाचालकाने प्रवाशांना रिक्षा फ्री केल्याने ही धमकी देण्यात आल्याचं रिक्षावाल्याकडून सांगण्यात येतं आहे. या प्रकरणी पोलिसांत फिर्याद देण्यात आली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
कर्नाटकात कोणाची सत्ता येणार ? भाजपला डिवचत शरद पवारांनी सांगितला अंदाज
साधू मगर असं या रिक्षाचालकाचं नाव असून या रिक्षाचालकाने याआधीपासून भारतीय लष्करातील जवानांकडून पैसे घेत नाहीत. अशातच द केरळ स्टोरी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर रिक्षाचालकाने आपल्या रिक्षाच्या हा चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांकडून पैसे घेणार नसल्याबाबतचं पोस्टर रिक्षामागे लावलं होतं. त्यानंतर या रिक्षाचालकाला काही कट्टरपंथीयांकांकूडन धमकी देण्यात आल्या आहेत.
The Kerala Story: द केरळ स्टोरीच्या सिनेमॅटोग्राफरने सांगितला शूटिंगबद्दलचा ‘तो’ किस्सा
साधू मगर यांना कॉल करुन आणि मेसेजद्वारे राजस्थानच्या कन्हैयालाल सारखी तुमची परिस्थिती करु, अशी धमकी दिली आहे. या धमक्या परदेशातून येत आहेत. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. तसेच धमकीचे पुरावेही दिले आहेत. साधू मगर यांनी 2 मे 2023 रोजी ‘द केरळ स्टोरी’ पाहण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांकडून पैसे न घेण्याची घोषणा करणारे पोस्टर बनवले होते.
हे पोस्टर रिलीज झाल्यानंतर एकीकडे त्याचे अनेकांनी कौतुक केले. दुसरीकडे त्यांच्या या निर्णयामुळे कट्टरपंथी लोकांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. दरम्यान, मद्रास उच्च न्यायालयात या चित्रपटासंदर्भात याचिका दाखल झाली. हा चित्रपट इस्लामच्या विरोधात नसून, आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या विरोधात असल्याचे सांगत या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली.