मुख्यमंत्र्यांच्या कृतीने मराठी मन दुखावले; रोहित पवारांचा शिंदेंवर हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांच्या कृतीने मराठी मन दुखावले; रोहित पवारांचा शिंदेंवर हल्लाबोल

Karnataka Assembly Elections 2023 : गेल्या काही दशकांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद सुरु आहे. यावरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केला होता. त्यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा दोन्ही राज्यातील सीमावाद तापला होता. आता कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपच्या प्रचाराला कर्नाटकात गेले आहेत. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कन्नड भाषेतील पोस्टर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आंदोलनातील फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये म्हटले की, सीमाभागातील लढ्याच्या आठवणी सभागृहात सांगणारे मुख्यमंत्री मनाला भावले होते. परंतु त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली मिळमिळीत भूमिका आणि मराठी स्वाभिमान दुखावणाऱ्या बोम्मई सरकारच्या प्रचारासाठी जाण्याची आजची भूमिका गोंधळात टाकणारी आहे. भूतकाळ आणि वर्तमानात विरुद्ध टोकांना बदलत जाणारी भूमिका बघून मराठी मन नक्कीच दुखावले असेल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ भूमिकेवर विखे पाटील बोलले; म्हणाले, बारसूला विनाकारण..

भाजप आणि काँग्रेसचे नेते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचारासाठी येत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाभागात प्रचाराला येणार नाही, असं स्पष्ट केल्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांतून समाधान व्यक्त केलं जात आहे. तीन-चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदींना एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला आहे.

बोम्मईंची पुन्हा जीभ घसरली
हुबळी येथे भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री बोम्मई यांची महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत जीभ घसरली. महाराष्ट्र एकीकरण समिती ही उचापती लोकांची संघटना आहे. आम्ही त्यांचा बंदोबस्त करु, असे विधान केले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी बोम्मई म्हणाले होते की कर्नाटकातील सीमावर्ती जिल्ह्यांचा कोणताही भाग सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट यासारखे कन्नड भाषिक भाग कर्नाटकात विलीन करावेत, अशी आमची मागणी आहे, अशी मागणी बसवराज बोम्मई यांनी केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube