सातारा (Satara) जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत आहे. अशातच उपचारा दरम्यान साताऱ्यात दोघांचा मृत्यू (death due to covid) झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयासह सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोना आणि सिझनल इन्फ्लुएन्झा आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांत मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश दिले आहेत. यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकच जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Gaja Marne विरोधात २० कोटींच्या खंडणीचा गुन्हा : पण… पोलिसांना पुरावा सापडला नाही!
राज्यात सध्या कोरोना आणि इन्फ्लूएंझा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सातारा जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्माचाऱ्यांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच सार्वजनिक ठिकाणी, लग्न समारंभ, यात्रा, मेळाव्यात मोठ्या प्रमाणात लोकं एकत्र येत असतात. या ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. सार्वजनिक मास्कसह सोशल डिस्टसिंग, सॅनिटायझरचा वापर करण्याचं आवानह जिल्हाधिकारी जयवंशी यांनी केलं आहे.
मोदी है तो मुमकीन है! 1992 साली लाँच झालेला फाँट 1983 साली कसा? काँग्रेसचा मोदींना सवाल
दरम्यान, सातारा जिल्ह्यात दोन जणांचा कोरोना विषाणूने बळी घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नसून दोघांचा मृत्यू झाल्यानंतरच साताऱ्यात जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असल्याचं बोललं जातंय.
रविवारी राज्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला असून दिवसभरात 562 नव्या रूग्णांची नोंद झालीय. सध्या राज्यात कोरोनाचे 3 हजार 488 हून अधिक सक्रिय रूग्ण आहेत.