Vijay Thalapathy : ‘हा’ फोटो शेअर करुन दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने केले इन्स्टाग्रामवर पदार्पण

Vijay Thalapathy : ‘हा’ फोटो शेअर करुन दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने केले इन्स्टाग्रामवर पदार्पण

Vijay Thalapathy On Instagram : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने (Thalapathy Vijay) इंस्टाग्रामवर (Instagram) आपलं नवे अकाउंट उघडले आहे. विजयच्या या नव्या इंस्टाग्राम एन्ट्रीने त्याच्या प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. इंस्टाग्रामवर एन्ट्री करत विजयने चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

इंस्टाग्रामवर नव्याने एन्ट्री करताच थलापती विजयचे अवघ्या काही क्षणातच ४० लाख फॉलोअर्स झाले आहेत. थलापती विजयने इंस्टाग्रावर पदार्पण करत चाहत्यांसाठी एक खास पोस्ट केली आहे. त्याने स्वत:चाच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो पांढरा टी- शर्ट आणि काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसून आला आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शन लिहिले आहे की,”नमस्कार मित्रांनो”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay (@actorvijay)


विजयचा इंस्टाग्रामवर जलवा!
इंस्टाग्राम नव्या एन्ट्रीमुळे थलापती विजय सध्या जोरदार चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर एन्ट्री केल्यावर अवघ्या काही क्षणात विजयचे ४० लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. तसेच त्याच्या फोटोला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली आहे. जवळपास ४१ लाख लोकांनी विजयचा फोटोला लाइक केला आहे. तसेच चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत विजयला शुभेच्छा देत आहेत.

#ThalapathyOnINSTAGRAM ट्रेडिंगमध्ये
थलापती विजय इंस्टाग्रामवर येताच ट्वीटवर ‘#ThalapathyOnINSTAGRAM’ हे ट्रेड सुरु झाला आहे. तसेच सर्वात पहिले त्याला किर्ती सुरेश आणि रश्मिका मंदान्नाने फॉलो केलं आहे. तर थलापती विजय हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक गाजलेला अभिनेता आहे. त्याचे कोट्यवधी चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर राहतात. यातच आता विजयच्या इंस्टाग्राम नव्या एन्ट्रीने त्याचे प्रेषक आनंदी झाले असल्याचे दिसून येत आहेत.

Bholaa Box Office Collection: चौथ्या दिवशी चित्रपटानं कमावले तब्बल ‘इतके’ कोटी!

थपापती विजयचा ‘वरिसु’ हा सिनेमा नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने देशभरात 300 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमातील विजय आणि रश्मिका मंदान्नाची केमिस्ट्री प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडला होता. आता लोकेश कनदराजच्या नव्या सिनेमात विजय झळकणार आहे. या सिनेमात विजयसह संजय दत्तदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. हा सिनेमा 19 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube