Download App

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र; अखेर गुन्हा दाखल

  • Written By: Last Updated:

Kharghar Tragedy: महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेले आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने पत्र दोन दिवसांपासून व्हायरल झाले होते. हे पत्र बनावट असल्याचे धर्माधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले होते. आता याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याचा तपास रायगड स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा खारघर येथे झाला होता. सुमारे वीस लाख श्रीसदस्य सोहळ्याला उपस्थित होते. उष्माघातामुळे अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राजकीय पडसाद उमटले आहे. धर्माधिकारी यांनी याबाबत दुःख व्यक्त केले होते.

36 दिवसांपासून फरार असलेला अमृतपाल सिंग अखेर पोलिसांच्या ताब्यात

परंतु आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने पत्र दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. पत्रकात सरकारविरोधात मजकूर होता. राज्य सरकारच्या गलिच्छ कारभारामुळे मला व माझ्या साधकांना त्रास झाला आहे. मी पुरस्कार नको बोललो होतो. मला जबरदस्तीने पुरस्कार घ्यायला भाग पाडले. माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला व त्यांचा जीव घेतला. त्यामुळे येथून पुढे भाजप व शिंदे गटाला मतदान करू नका. मी लवकरच पुरस्कार परत करत आहे, असा मजकूर या पत्रात होता. त्याखाली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सही आहे. धर्माधिकारी यांनी यापूर्वी लिहिलेल्या एका पत्रात तोडमोड करून बनावट पत्र तयार करण्यात आले.

नवले पुलानजीक ट्रक – ट्रॅव्हल्सची धडक तिघांचा मृत्यू

हे पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. त्यामुळे खळबळ उडाली होती. हे पत्र खोटे असल्याचे धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करण्यात आले. त्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार शनिवारी रात्री उशीरा अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.

Tags

follow us