Uddhav Thackeray : आमच्यासोबत येणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना वेगवेगळ्या चौकशांना सामोरे जावे लागत आहे. पण थांबा आमचेही दिवस येतील. तेव्हा हे सर्व व्याजासह फेडू. फक्त व्याजासह नाही तर चक्रवाढ व्याजासह फेडू, असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिला. उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. येथे सावंतवाडीत त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.
ठाकरे पुढे म्हणाले, होय मी घराणेशाहीचा वारसा घेऊन पुढे चाललो आहे. जोपर्यंत हे शिवसैनिक माझ्याबरोबर आहेत तोपर्यंत असे कितीही गद्दार येवोत मला त्याची पर्वा नाही. मला गद्दारांना गाडायचीही गरज नाही तु्म्हीच ते काम कराल. मिंधेंकडे माझे करोडो रुपये आहेत असे गणपत गायकवाडांनी सांगितले. आता मोदी गॅरंटी मिंधेंना पावणार का, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. आम्ही तुमचे शत्रू नव्हतो, आजही नाही. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. तुमच्या पिलावळीनं काम केलं असतं तर पक्ष फोडायची वेळ आली नसती असे आव्हान त्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलं.
Uddhav Thackeray : ठाकरेंकडून नाशिक ‘फ्रिज’ भुजबळांच्या बालेकिल्ल्यातून मोदींना करणार ‘चेकमेट’
परवा गोळीबार झाला आला का आवाज तुमच्यापर्यंत. कुणी केला. तुम्ही एक लक्षात घ्या की शिवसेनेने कोकणला कसं वाचवलं आणि तुम्ही सुद्धा कसे वाचलात. त्यावेळी तुम्ही जर विनायक राऊत आणि या लोकांना निवडून दिलं नसतं तर एकदम साफ करून टाकायचं. मध्ये मंदिरात साफसफाई करताना मोदीजींचा फोटो आला होता. लादी चकचकीत होती तरीही हे साफसफाई करत होते. तोच झाडू घेऊन तिकडचा जो एक मतदारसंघ राहिला आहे तिथून सुद्धा ही घाण साफ करून टाकायची. इथून तर करायचीच आहे. सावंतवाडी सुद्धा करायचीच बाजू सु्द्धा साफ करायची.
गणपत गायकवाडने जो गोळीबार केला. लगेच या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले. कुणी मागितलं होतं. तरीही आलं. मी मुद्दाम तुम्हाला या गोष्टी सांगतोय कारण कुणीही न मागता फुटेज तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात. पण लबाडाने जो निकाल दिला आणि शिवसेना मिंध्यांची आहे असं सांगितलं. शिवसेनेची घटनाच नाही, शिवसेनेत पक्षप्रमुखपदच नाही मग ती सुद्धा जी फिल्म आम्ही दाखवली त्याचं चित्रीकरण आमच्याकडे नाही मागितलं तर आयोगाकडे मागितलं. आयोगाने सांगितलं आमच्याकडे नाही. परंतु, तेच चित्रीकरण आम्ही जनतेच्या न्यायालयात दाखवलं हा फरक लक्षात घ्या, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.