Download App

लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक होणार की नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितले…

Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून मराठा (Marath Reservation) आणि ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) राज्यातील राजकीय वातावरण तपाले. लोकसभेसोबतच विधानसभेच्या देखील निवडणुका होतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु या सर्व चर्चाना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पूर्णविराम दिला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, याचे संकेत दिले आहे. कर्जत खालापूर येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की इथले तरुण वेगवेगळ्या घोषणा देत होते, त्याबद्दल काही काळजी करु नका. पहिले लोकसभेची निवडणूक आहे. नंतर जे तुमच्या मनात आहे ती निवडणूक आहे. अलिकडच्या काळात विरोधी पक्षाचे लोक रोज काहीतरी बोलत असतात, आपण प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही. आपण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील आहोत, असं अजित पवार म्हणाले.

शेतकऱ्यांच्या बांधावर काँग्रेसची फौज, 34 नेते 34 जिल्ह्यांत अवकाळीची पाहणी करणार

राज्यात सातत्याने राजकीय सभा होत आहेत. पण विधानसभा निवडणूक लवकर होईल, अशी शंका मनात ठेऊ नका, असे अजित पवार यांनी म्हटले. ते पुढं म्हणाले की लोकशाहीत काम करताना बहुमताचा आदर करावा लागतो. हे आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगत होतो. पण आमचं एकलं नाही. राज्यकीय भूमिका घ्याव्या लागतात. नितीश कुमार, जयललिता, ममता बॅनर्जी यांनीही त्या त्या राजकीय परिस्थितीनुसार भूमिका घेतल्या. राज्यात देखील अनेकवेळा काही भूमिका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळं परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे आपण देखील घेतला आहे.

सत्ताधारी आमदारांच्या निधीचा ‘सातबारा’ अधिवेशनात निघणार; राष्ट्रवादीने सांगितला ‘मास्टर प्लॅन’

मराठा समाज मागण्याबाबत राजकीय पक्षांची बैठक घेतली. इतरांना दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिलं जावं अशी भूमिका घेण्यात आली आहे, असं अजित पवार म्हणाले. काही दिवसांपूर्वी आजारी होतो, मला राजकीय आजार झाला अशी चर्चा झाली पण मी लेचापेचा नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.

Tags

follow us