Download App

सामंतांच्या भावाला तिकीट मिळालं तर मी स्वतः प्रचार करील; कदमांचं क्लिअर पॉलिटिक्स !

Maharashtra Politics : मागील काही दिवसांपासून शांत असलेले माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) आता निवडणुकीच्या तोंडावर चांगलेच सक्रिय झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांसह (Lok Sabha Election) शिवसेना आमदार प्रकरण, महायुती सरकार, उद्धव ठाकरे या मुद्द्यांवर त्यांनी रोखठोक मते व्यक्त केली. कदम यांनी आज रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत महत्वाचे विधान केले.

उद्योगमंत्री उदय सामंतांचे बंधू रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात उमेदवार का होऊ शकत नाही असे तुम्ही म्हणाला होतात असे त्यांना विचारले असता कदम म्हणाले, मी असं काही विधान केलेलं नाही. मला प्रश्न विचारला गेला होता की उदय सामंत यांचे बंधू उभे राहिले तर काय होईल? मी म्हटलं मला आनंद होईल. उलटपक्षी त्यांची बाजू घेऊन मी मुख्यमंत्र्यांकडे जाईन आणि त्यांच्या उमेदवारीसाठी मी दुजोराही देईन. इतकच नाही तर जर त्यांना तिकीट मिळालं तर त्यांच्या प्रचारालाही जाईन. निश्चित जाईन. ते शंभर टक्के निवडून येतील असं माझं प्रामाणिक मत आहे.

शिंदेंचं काम, बापही पळतोय, बेटाही पळतोय; कदमांचा ठाकरेंवर हल्लाबोल

मला वाटतं या सगळ्या अफवा आहेत. खोटे, चुकीच आणि दिशाभूल करणारे हे सगळे दावे केले जात आहेत. विधानसभेच्या अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने काही दिशानिर्देश दिले आहेत. त्यानुसार ते काम करत आहेत. त्यांचं एखादं काम दिल्लीत आहे म्हणजे ते मुख्यमंत्री बदलाच्या संदर्भात तेथे गेलेत असा त्याचा अर्थ नाही. मुख्यमंत्री बदलणे हा विषय विधानसभेच्या अध्यक्षांचा नसतो.

जर राणेंना तिकीट मिळाले तर असे विचारल्यावर ते म्हणाले, जर तरच्या प्रश्नांना काही अर्थ नसतो. आमची शिवसेना भाजप युती आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकत्रित जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. आमच्यात कोणतीही कटुता येणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत, असे कदम म्हणाले.

वेगळा काही निर्णय होईल असं वाटत नाही

न्यायालयाने  विधानसभा अध्यक्षांना जे निर्देश दिले आहेत त्यात मुख्य बाब ही आहे की शिवसेना नेमकी कुणाची ते आधी पहा. आणि निर्णय घ्या. पण, यावर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं आहे. अध्यक्ष कागदपत्रे तपासतील. इंदिरा गांधी यांच्या काळापासून ज्यांच्याकडे आमदार खासदार जास्त त्यांचा पक्ष असेच निर्णय लागलेले आहेत. त्यामुळे येथेही काही वेगळा निर्णय होईल असं मला वाटत नाही. काही लोकं देव पाण्यात बुडवून बसलेत पण त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असा टोला कदम यांनी लगावला.

Radhakrishn Vikhe : संजय राऊत सर्वात मोठा दलाल; मंत्री विखेंची कडव्या शब्दांत टीका

आधीचा मुख्यमंत्री शेपटी घालून बसला होता

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी लोकहिताचे जवळपास 300 निर्णय घेतले आहेत. आधी जो मुख्यमंत्री होता उद्धव ठाकरे तो शेपटी घालून बसलेला होता, त्याचं काय. अडीच वर्षात अडीच तासही मंत्रालयात गेला नाही, गिनीज बुकातच त्याने नोंद केली. त्यांना विचाराना आधी. यांना कोण विचारतं. कुणावरही टीका करायची आणि मी मोठा झालो असं म्हणायचं याला काही अर्थ नाही, असे प्रत्युत्तर कदम यांना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना दिले.

Tags

follow us