शिंदेंचं काम, बापही पळतोय, बेटाही पळतोय; कदमांचा ठाकरेंवर हल्लाबोल

शिंदेंचं काम, बापही पळतोय, बेटाही पळतोय; कदमांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Ramdas Kadam : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) घडामोडींनी वेग घेतला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्याकडून आता ठाकरे आणि शिंदेंना नोटीसा पाठवल्या जाणार असल्याचे समजते. मात्र या सगळ्याच प्रकरणात विलंब झाल्याने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. दोन्ही गटात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आता शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

कदम यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंवर मी बोलणं योग्य होणार नाही. उद्धव ठाकरेंवर मी बोलणार. आदित्य ठाकरेंची एवढी उंची नाही की मी त्यांच्यावर बोलावं. आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप आमदार, खासदार, मंत्री, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भेटही घेत नव्हते. पण,आता एकनाथ शिंदेंनी त्यांना असं कामाला लावलंय की बापही पळतोय आणि बेटाही पळतोय.

BJP : कामं करा, नाहीतर राजीनामा द्या; बावनकुळेंच्या निशाण्यावर नेमकं कोण?

यानंतर त्यांनी संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत राऊत यांच्यावर सडकून टीका केली. कुणाला राजकीय दृष्ट्या कायमचं स्मशानात जायला लागेल याचं दूध का दूध, पाणी का पाणी होईलच. निवडणूक आयोगानं शिवसेना कुणाची यावर शिक्कामोर्तब केलं आहे. शिंदे मुख्यमंत्रीपदावर बसल्यापासून संजय राऊतांची पोपटपंची सुरू आहे. कावळ्याच्या शापाने गायी मरत नाहीत, अशी टीका कदम यांनी केली.

काय म्हणाले होते राऊत ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 16 आमदार लवकरच अपात्र होतील. या सर्वांची राजकीय तिरडी बांधलेली असून, आता फक्त हे राम म्हणायचे बाकी आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनीसर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डावलून निर्णय घेतला नाही तर, संसदीय राजकारणाच्या इतिहासात त्यांचे नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिले जाईल असेही राऊत म्हणाले. आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार, नार्वेकर यांना 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावाच लागेल, असे राऊत म्हणाले होते.

आमदार अपात्र होणार म्हणूनच राहुल नार्वेकरांची चालढकल; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गंभीर आरोप

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube