Download App

“भाजपने लढण्यास भाग पाडलं पण, ही माझी शेवटची निवडणूक”; राणेंनी दिले निवृत्तीचे संकेत

भाजपने मला निवडणूक लढण्यास भाग पाडलं. त्यामुळे मी पक्षाप्रती माझी जबाबदारी पार पाडत आहे. या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे.

Narayan Rane Statement on Lok Sabha Election : रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीने शिंदे गटाला माघार घ्यायला लावत केंद्रीय मंत्री नारायण राणेंना तिकीट दिलं. राणेंनी प्रचार सुरू केला आहे. मात्र या निवडणुकीबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याची राज्यात चर्चा होत आहे. भाजपने मला निवडणूक लढण्यास भाग पाडलं. त्यामुळे मी पक्षाप्रती माझी जबाबदारी पार पाडत आहे. या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे. ही माझी शेवटची निवडणूक आहे कारण आता थांबण्याची वेळ आली आहे, असे नारायण राणे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

Narayan Rane : माझ्यावर टीका करतो, एक दिवस चोप देणार; भास्कर जाधवांना थेट नारायण राणेंची धमकी !

या मुलाखतीत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ठाकरेंच्या बाजूने कोणतीही सहानुभूतीची लाट नाही. ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षातील मंत्री आणि आमदार त्यांना सोडून गेले. याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे कुणालाच भेटत नसायचे. त्यांच्याकडून नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळायची. त्यांनी हिंदू समाजाशी गद्दारी केली आणि पवारांसोबत गेले. ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा अपमान केला आहे. शिवीगाळ करणाऱ्या लोकांना सिंधुदुर्गात परवानगी देऊ नये.

या निवडणुकीत रत्नागिरी सिंधु्दुर्ग मतदारसंघातून लढण्यास भाग पाडलं. आता पक्षानं दिलेली जबाबदारी मी पार पाडत आहे. विजयही माझाच होणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत आणि मी खासदार व्हावं अशी येथील जनतेची इच्छा आहे. मला मतदान करण्यासाठी मतदासंघ मतदानाच्या दिवसाची वाट पाहत असल्याचे राणे यांनी सांगितले.

आता पुन्हा निवडणूक लढणार नाही

या निवडणुकीनंतर आता मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही. मला वाटतं आता थांबण्याची वेळ आली आहे. मी मागील बऱ्याच वर्षांपासून राजकारणात आहे. माझी दोन मुले सुद्धा राजकारणात आहेत. त्यामुळे आता मला असं वाटतं की आता आराम केला पाहिजे, असे स्पष्ट करत नारायण राणे यांनी एक प्रकारे सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले.

छगन भुजबळांनी नाशिकचं मैदान सोडलं, लोकसभा निडणुकीतून माघार; वाचा नक्की काय घडलं?

यानंतर नारायण राणेंनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. मविआ सरकारने माझ्याविरुद्ध सुडाचं राजकारण केलं.  काहीही कारण नसताना मला अटक केली. माझं घर पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला टार्गेट करण्यासाठी त्यांच्याकडून कायद्याचा गैरवापर करण्यात आला. 2019 च्या निवडणुकीनंतर भाजपबरोबरील युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत उद्धव ठाकरेंनी सुडाचं राजकारण सुरू केलं होतं.

follow us