Aditya Thackeray : राज्यात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. बाप्पांच्या दर्शनाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांचे सोशल इंजिनिअरींगही पाहण्यास मिळत आहे. कोकणात गणेशोत्सवाचा वेगळाच उत्साह आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मंडळाला आणि घरांतील बाप्पाच्या दर्शनासाठी भेटी देत आहेत. त्यामुळे कोकणातील राजकारणाचा पारा चढला आहे. ठाकरे यांच्या या दौऱ्यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी खोचक टीका करत त्यांना सल्लाही दिला आहे.
Mla Disqualfication : SC ने कान पिळल्यानंतर नार्वेकरांचा वेग वाढला; ठाकरे-शिंदेंना नोटीस पाठवणार?
आदित्य ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं. गणरायाचं दर्शन घ्यावं. पण, आपल्या पक्षात नसलेल्या लोकांवर दबाव टाकण्यासाठी त्यांच्या घरी जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मला अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले. काय करायचे असे त्यांनी मला विचारले. त्यावर मी त्यांना म्हणालो, की त्यांना जरूर घरी येऊ द्या पण, तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहा. गणेशोत्सवात असे करणे कितपत योग्य आहे, असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला. सणांमध्ये राजकारण आणू नये. त्यांचं पावित्र्य राखावं या मताचा मी कार्यकर्ता आहे. माझं आदित्य ठाकरे यांनाही हेच सांगणं आहे की त्यांनीही त्यांच्या जीवनात काळजी घ्यावी, असे केसरकर म्हणाले.
आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. राजकीय नेतेमंडळीही कोकणात दाखल होत आहेत. नेते कार्यकर्त्यांच्या गणेश मंडळांना भेटी देण्याचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे कोकणातील राजकारण तापले आहे. आदित्य ठाकरेही सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. येथे ते शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतींनाही भेटी देणार आहेत.
Maharashtra Politics : शिंदे अपात्र ठरल्यास CM कोण? अजितदादा, विखे, गडकरीही रेसमध्ये