Uday Samant On Vinayak Raut : मला काही मर्यादा आहेत, ज्यांना मी 70 हजारांचं मताधिक्क्य दिलंय ते माझ्यावर टीका करताहेत तर काय बोलावं, या शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांना सुनावलं आहे. दरम्यान, पाणबुडी प्रकल्पावरुन राऊतांनी सामंतांच्या उद्योग खात्यावर सडकून टीका केली होती. सामंत यांचा ‘निरुद्योगी उद्योगमंत्री’ असा विनायक राऊतांनी केला होता. त्यावर सामतांनी चांगलच खडसावलं आहे.
दिवसेंदिवस किंग खानच्या ‘डंकी’ची बिकट परिस्थिती, 13व्या दिवशी निम्म्याहून कमी कमाई
उदय सामंत म्हणाले, महानंदाचा आणि उद्योगखात्याचा काय प्रश्न आहे. पाणबुडीवरुन उद्योग खात्यावर टीका केली जात आहे. माझं उद्योग खातं एवढं प्रकाशझोतात आहे की, महाराष्ट्रात कुठेही काहीही झालं तरीही उद्योग खात्यामुळे होतंय असं विरोधक सांगतात तेव्हा उद्योग खात्याचं काम चांगल्या पद्धतीने चाललंय
असं मला वाटतं, असल्याचं उदय सामंत म्हणाले आहेत.
Horoscope Today : आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
तसेच मी कोणावर बोलावं याला मर्यादा आहेत, ज्यांना माझ्या मतदारसंघातून मी 70 हजारांचा मताधिक्य दिलंय ते माझ्यावर टीका करीत असतील तर काय बोलावं सोडून द्यायचे विषय असं म्हणत उदय सामंतांनी विनायक राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आयारामांना चाप अन् नव्या चेहऱ्यांचा शोध; भाजपने विनोद तावडेंवर सोपविली मोठी जबाबदारी
काय म्हणाले होते विनायक राऊत?
सिंधुदुर्गातील पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला जाण्यामागे जर तुम्ही आदित्य ठाकरेंचे नाव घेत असाल तर सामंत यांच्यासारखा निर्बुद्ध मंत्री या राज्याला या अगोदर मिळाला नाही. उदय समंत यांचा फील्डिंग लावायचा नेहमीचा धंदा असून ते यावेळी सुद्धा इकडचा एबी फॉर्म घेतील आणि भाजपमध्ये उडी मारतील.
जपानला एक दोन नव्हे तब्बल 155 भूकंपाचे धक्के; 12 ठार, हजारो नागरिक स्थलांतरित
उदय सामंत यांचा उल्लेख निरुद्योगी उद्योगमंत्री असा करावा लागेल कारण त्यांनी उद्योगमंत्री पद सांभाळल्यापासून सर्व उद्योग गुजरातला पाठवण्याचे काम केले अशी टीका राऊत यांनी केली होती. तसेच लाचारी करणं या पलीकडे उदय सामंत काही करु शकत नसल्याचंही ते म्हणाले होते..
काँग्रेसचे 9 आमदार देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ते लपवण्यासाठी उलटा आरोप केला जातो आहे. पूर्वी हा आकडा 13 होता आता 9 झाला आहे पण पुन्हा 13 होऊ शकतो, असा दावाही उदय सामंतांनी केला आहे. तसेच आमदार बच्चू कडू आमच्या घटक पक्षातील आहेत. त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलणार असल्याचंही सामंतांनी स्पष्ट केलं आहे.