Barsu Refinery : “पोलिसांच्या छावण्या हटवून लोकांशी बोला, तरचं…” विनायक राऊत आक्रमक
सरकारला जर हा प्रकल्प चांगला आहे, असं वाटत असेल तर त्यांनी पोलिसांच्या छावण्या हटवून लोकांशी थेट संवाद साधायला हवा. लोकांच्या घरात जाऊन त्यांना समजून सांगायला हवं. अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. बारसू प्रकरणातील हे प्रश्न मांडण्यासाठी आज आंदोलक आज उद्धव ठाकरे यांना भेटल्याची माहितीही विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की मी स्वतः काल बारसू मधील स्थानिक लोकांना भेटून आलो आहे, तिथे कोणीही बाहेरचे नागरिक आहेत. पण सरकारकडून तिथे पोलिसांच्या पलटणी उभ्या करण्यात आले आहेत. मुंबईतील चाकरमान्यांना देखील अटक केली जात आहेत, नोटिसी पाठवल्या जात आहेत. स्थानिक लोकांनी वेळ मागितल्यावर त्यांना वेळ द्यायची नाही, मग ते आंदोलनाला आल्यावर त्यांना पोलिसी खाक्या दाखवायचा. हे बरोबर नाही. नागरिकांनी न्याय शासनकर्त्याकडे मागायचा नाही तर दुसऱ्या कोणाकडे मागायचा, असा थेट सवाल त्यांनी यावेळी विचारला.
Amol Kolhe : ‘हिंदुत्वा’च्या बाबतीतील राज ठाकरे यांची भूमिका मला पटली
बारसू मध्ये आम्हाला रिफायनरी नको, यासाठी रिफायनरी विरोधी संघटनेने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तीन पत्रे दिली आहेत. त्यात त्यांनी त्यांची वेळ मागितली आहे. पण त्यांना मुख्यंमत्री किंवा उद्योग मंत्र्यांनी वेळ दिला नाही. आतापर्यंत त्या ठिकाणी सात वेळा शांततापूर्ण आंदोलने झाली आहेत. पण आता ज्या पद्धतीने पोलीस त्यांना दहशतीखाली ठेवत आहेत. असा आरोप विनायक राऊत यांनी सरकारवर केला आहे.
शासन चर्चा का करत नाही ?
सरकारकडून सांगण्यात येत आहे की हा प्रकल्प फायद्याचा आहे. मग सरकार हे लोकांना समजून का सांगत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यंमत्री किंवा उद्योगमंत्री थेट लोकांना का भेटत नाही. त्यांना हा प्रकल्प फायद्याचा आहे, हे पटवून का देत नाही. फक्त जिल्हाधिकार अंडी पोलीस अधीक्षक यांना समोर करून सरकार दडपशाही का करत आहे ? असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला.
शिंदे-अमित शाह न झालेली भेट कुणासाठी फलदायी ? कुणाला मारक ?
सरकारला जर हा प्रकल्प चांगला आहे, असं वाटत असेल तर त्यांनी पोलिसांच्या छावण्या हटवून लोकांशी थेट संवाद साधायला हवा. लोकांच्या घरात जाऊन त्यांना समजून सांगायला हवं. त्यांना समजून सांगायच्या ऐवजी लोकांचं हत्याकांड झालं तरी चालेल पण सौदी अरेबियाचची रिफायनरी झालीच पाहिजे, अशी सुपारी घेऊन राज्य सरकार काम करत आहे का ? असा सवाल त्यांनी विचारला
उद्धव ठाकरे बारसूला जाणार
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे बारसू परिसराला भेट देणार आहेत. त्या प्रकल्पच्या परिसरातील पाचही गावातील नागरिकांना ते भेटणार आहेत. आज देखील या परिसरातील नागरिक उद्धव ठाकरे यांना भेटून गेले आहेत. अशी माहितीही विनायक राऊत यांनी यावेळी दिली.