‘भाजपच्या नेत्यांसमोर तोंड उघडू शकत नाही’; दानवेंचा सामंत, राणे, केसरकरांवर प्रहार
Ambadas Danve : प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या नेत्यांसमोर कोकणातील नेते तोंड उघडू शकत नाही, असा प्रहार ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. दरम्यान, पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेल्याप्रकरणी विरोधकांकडून सत्ताधारी भाजपला चांगलच धारेवर धरलं जात आहे. अशातच आता कोकणातले नेतेच प्रकल्प नेण्याला जबाबदार असल्याचा आरोपही दानवेंनी केला आहे.
IIT BHU च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, भाजपशी कनेक्शन असलेले तीन आरोपी गजाआड
अंबादास दानवे म्हणाले, प्रकल्प गुजरातला जाणं हे नवीन नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आधी प्रोजेक्ट रिपोर्ट, खर्च, जागा ठरवायंच. त्यानंतर गुजरातला प्रकल्प पळवायचा हे काही नवीन नाही. कोकणातील नेते, उदय सामंत, नितेश राणे, दीपक केसरकर जे वटवट करीत असतात त्यांनी स्वत:च्या बुडाखाली काय जळतंय हे पहावं, ते नूसतंच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात गुंग असल्याचं दानवे म्हणाले आहेत.
Devendra Fadnavis : शिंदे अन् अजितदादांना सोबत का घेतलं? फडणवीसांनी सांगूनच टाकलं
सत्ताधारी रिफायनरी प्रकल्प गुजरातला नेत नाहीत. पाणबुडी कसा नेतात गुजरातला? असा सवालही दानवे यांनी केला आहे. प्रकल्प गुजरातला नेण्यासाठी कोकणातलं नेतृत्व बेजबाबदार आहे. हे सरकार असेपर्यंत हीच परिस्थिती राहणार असून त्यांच्यासमोर कोकणातले नेते तोंड उघडू शकत नाही, असंही ते म्हणाले आहेत.
निवडणुकीवर बहिष्कार टाकणार, न्यायालयातही जाणार; खरेदी विक्री संघाचा कारभार ढाकणेंच्या रडारवर
2018 पासून या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती, पण आता तो गुजरातला गेलायं. राज्याचे मोठ-मोठ्या मंत्र्यांचं कुठं लक्ष आहे, ते फक्त उद्धव ठाकरेंवरच लक्ष ठेवत असून त्यांच्या समन्वयाअभावी प्रकल्पा गेला, असल्याचंही दानवेंनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, देशात पहिल्यांदाच राबविण्यात येणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गात होणार होता. मात्र, येथील प्रकल्प बंद पडला असून गुजरातला प्रकटणार आहे. हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला आहे. सिंधुदुर्गातील या प्रकल्पासाठी 56 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला होता. इतकेच नाही तर काही निधीही देण्यात आला होता. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू होणे अपेक्षित होते, मात्र, आता हा प्रकल्प गुजरातला नेला आहे.