Download App

Irshalwadi Landslide : आई-वडील, भाऊ-मुलगा कोणीच वाचलं नाही; राहिला तो फक्त ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश…

Raigad Khalapur Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावात रात्री लोकं झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मुसळधार पावसाने रौद्ररुप दाखवलं. या पावसात अख्ख्या गावावरच मोठी दरड कोसळली. आता दिवस उजाडल्यावर या भयानक घटनेचं मन विषण्ण करणारं खरं रुप समोर आलं आहे. लोकांचे रडणं, ओरडणं आणि आपल्या आप्त स्वकियांना शोधण्यासाठी सुरू असलेली धडपडच दिसते आहे. तर काहींनी आपलं संपूर्ण कुटुंब गमावल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आई-वडील, भाऊ कोणीच वाचलं नाही; राहिला तो फक्त ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश अशी काहीशी स्थिती या गावात निर्माण झाली आहे. ( No one is alive of Family in Raigad Khalapur Irshalwadi Landslide )

Irshalwadi : मंदिरात गेम खेळत बसलेली मुलं ठरली देवदूत; त्याच मोबाईलवरुन मागितली मदत

यावेळी एक महिलेने आपली ह्रदय पिळवटून टाकणारी व्यथा सांगितली. तिचा आक्रोश मन सुन्न करणारा होता. ती सांगत होती, या दुर्घटनेत तिच कोणीही जिवंत नाही राहिलं. आई-वडील, भाऊ कोणीच वाचलं नाही. तिचे सगळे कुटुंबीय अक्षरषः दरडीच्या खाली चेरपून गेले. एकीने तर आपली व्यथा सांगताना म्हटलं आई-वडिलांसह तिचि मुलगी ही यी गावात तिच्या मुलांसह रहात होती. तिचा अद्याप तपास लागलेला नाही. असं तिने सांगितलं. काहींना तर आपली व्यथा मांडण्यासाठी बोलताही येत नव्हतं. दुःखाच्या डोंगराने त्यांना सुन्न करून टाकलं आहे.

Raigad Landslide : क्षणात होत्याचं नव्हतं झालं.. इर्शाळवाडीवर कोसळला दुःखाचा डोंगर

एका आजीचा म्हतारपणी आधारच गेला. घरातील पाच मानसं मातीच्या ढीगाऱ्याखाली दबली गेली अन् ऐन म्हतारपणी या आजींच्या जगण्याला मोठी पोकळी आणि आधार हवा असण्याच्या वयातच तिचा आधार हारपल्याचं तिने सांगितलं. यावेळी आपली व्यथा मांडताना तिने जीवाच्या आकांतांने आपल्या या परिवाराला साद घातली. मात्र ती हवेतच विरली. तिचं कोणीच वाचलं नाही. अशा अनेक कुटुंबांपुढे या घटनेने दुःखाचा डोंगर उभा केला आहे.

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळ्याच्या घटनेत आतापर्यंत 80 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. साधारण 50 ते 60 घरं असलेल्या या गावात अंदाजे 250 लोकं राहत असल्याची माहिती आहे. यातील अजून साधारण 100 ते 125 लोकं अडकले असल्याचं सांगितलं जात आहे. बचावकार्य युद्धपातळीवर जखमींवर आधी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं जात आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

Tags

follow us