Video : राहुल गांधी म्हणजे राजकारणातील इम्रान हाश्मी; नितेश राणेंची झोंबणारी टीका

Nitesh Rane Attack On Rahul Gandhi & Sanjay Raut : एकीकडे लोकसभेत राहुल गांधींनी दिलेल्या फ्लाइंग किसवरून घमासान सुरू असतानाच आता, भाजप आमदार नितेश राणेंनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. राहुल गांधींचे कालचे भाषण म्हणजे कॉमेडी म्हणावं की संसदेतील भाषण म्हणावं असा प्रश्न पडला असून, राहुल गांधी म्हणजे राजकारणातील इम्रान हाश्मी असल्याचे म्हटले आहे. राणेंच्या या […]

Letsupp Image (62)

Letsupp Image (62)

Nitesh Rane Attack On Rahul Gandhi & Sanjay Raut : एकीकडे लोकसभेत राहुल गांधींनी दिलेल्या फ्लाइंग किसवरून घमासान सुरू असतानाच आता, भाजप आमदार नितेश राणेंनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. राहुल गांधींचे कालचे भाषण म्हणजे कॉमेडी म्हणावं की संसदेतील भाषण म्हणावं असा प्रश्न पडला असून, राहुल गांधी म्हणजे राजकारणातील इम्रान हाश्मी असल्याचे म्हटले आहे. राणेंच्या या विधानामुळे आता काँग्रेस विरूद्ध भाजप असा वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे.

हे होणार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान, भारतात होते उपउच्चायुक्त

राणे म्हणाले की, प्रत्येक वक्त्याला प्रेरणा मिळावी असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल भाषण केलं. त्या भाषणाच्या मिरच्या विरोधी पक्षाच्या प्रत्येक सदस्याला झोंबल्याचे ते म्हणाले. मणिपूर घटनेबाबत शाहांनी अतिशय महत्त्वाची माहिती देशाला दिली. तर, दुसरीकडे राहुल गांधींचे कालचे भाषण म्हणजे कॉमेडी सर्कस म्हणावं की संसदेतील भाषण म्हणावं असा प्रश्न पडला असून, हे महाशय भारत जोडो यात्रेमध्ये सगळकडे फ्लाइंग किस देत सगळीकडे फिरत होते.

राहुल गांधींनी जसं युद्ध जिंकलं आहे त्याप्रमाणे महिला खासदार आणि संजय राऊत त्यांना पाठिंबा देत असल्याची टीकाही राणेंनी यावेळी बोलताना केली. एका महिला सदस्याला फ्लाइंग किस देणं हे कोणाच्या संस्कृतीमध्ये बसतं याचं उत्तम उदाहरण कालपासून ठाकरे गटाचे खासदार आणि काँग्रेस खासदार देत असल्याचेही ते म्हणाले.

PM मोदींना जादुची झप्पी ते थेट फ्लाइंग KISS; लोकसभेतील गाजलेले राहुल गांधींचे किस्से

राऊतांना नेमकं काय म्हणायचं?

पुढे बोलताना राणेंनी राऊतांवर हल्लाबोल करत संजय राऊत हे फ्लाइंग किस देत संपूर्ण महाराष्ट्रात फिरतात. त्यांच्या या कृतीमुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील इम्रान हाश्मी म्हणायचं की, संजय राजाराम राऊत म्हणायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण सभागृहामध्ये बसून महिला खासदाराकडे बघून फ्लाइंग किस देणं त्यांना योग्य वाटतं. महोब्बत की दुकनं वाटतं असे म्हणत कोण कुणाला आणि कुठे कुठे फ्लाइंग किस देत बसताता याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. म्हणूनच आम्ही त्यांना महाराष्ट्रातील राजकाणातील इम्रान हाश्मी म्हटलेले आहे.

राऊतांच्या मालकांचे सुपुत्रांच्या नाईट लाईफबाबत यांना सगळं माहिती आहे. त्यामुळे त्यांना राहुल गांधींच्या कालच्या चुकीच्या कृतीचे काहीच वाटले नसेल अशी टीकाही राणेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्या ठाकरे यांचे नाव न घेता केली. कारण मालकाचे चिरंजीव आणि स्वतः राऊत फ्लाइंग किस आणि जादुच्या झप्प्याचं देत बसतात.

Exit mobile version