Download App

राजकारणातून निवृत्ती घेतोयं, माजी आमदाराने तुरुंगातच घेतला निर्णय…

Vivek Patil : शेतकरी कामगार पक्षाचे विवेक पाटील यांनी थेट तुरुंगातूनच पत्र लिहित सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतला आहे. विवेक पाटील यांनी पत्राद्वारे कार्यकर्त्यांचं आभार मानलं असून त्यांनी या निर्णयाबाबत कुठेही वाच्यता न करताच हा निर्णय घेत जाहीर केला आहे. त्यानंतर विवेक पाटील समर्थकांना त्यांनी निवृत्ती का घेतली असावी? हा प्रश्न पडला आहे.

जयंत पाटील पवारांची साथ सोडणार? अजितदादांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर म्हणाले…

कर्नाळा बॅंक घोटाळ्याप्रकरणात विवेक पाटील तुरुंगात आहेत. मागील दोन वर्षांपासून ते तुरुंगातच आहेत. तुरुंगात जाण्याआधी पाटील यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेली असून त्यांचा आजार अधिक बळावल्याने तुरुंगात लिहिलेल्या पत्रातमध्ये त्यांनी आजारपणाच कारण स्पष्ट केलं आहे.

शिंदे-फडणवीस-पवार सरकार टिकविण्याची जबाबदारी आता प्रसाद लाड यांच्यावर; बावनकुळेंची मोठी घोषणा

विवेक पाटील यांच्या निवृत्तीची बातमी समजताच शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अनेक वर्षे आपण विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असला तरी आम्ही त्यांची भेट घेऊ आणि त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बाळाराम पाटील म्हणाले आहेत.

Baipan Bhari Deva : जुन्या आठवणींमध्ये रमल्या अभिनेत्री

तसेच आज सकाळीच मला विवेक पाटील यांच्या पत्राची माहिती मिळाली. त्या पत्रावरील सही निश्चितपणे विवेक पाटील यांचीच आहे. हा निर्णय घेत असताना त्यांनी शेतकरी कामगार पक्षातील सर्व सहकार्यांचं पत्राद्वारे आभार व्यक्त केले आहेत. चार वर्षापूर्वी त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना आताही प्रकृतीचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे त्यांना दर आठवड्याला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखलं केलं जातं असल्याचं ते म्हणाले आहेत.

आम्ही मंडळी गेल्या ३६-३७ वर्षांपासून विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. त्यामुळे शेकापमधील अनेक कार्यकर्त्यांचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवृत्तीचा निर्णय घेतला असला तरी आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत. आमच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. तो निर्णय रद्द करावा, अशी विनंती करणार असल्याचंही बाळाराम पाटील म्हणाले आहेत.

Tags

follow us