Download App

रिफायनरीबाबत शरद पवार यांच्याशी काय चर्चा झाली, उदय सामंत यांनी सांगितलं…

  • Written By: Last Updated:

राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून मंगळवारी सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात पुन्हा भेट झाली.  शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. पण ही भेट रिफायनरीसंदर्भात नव्हती तर नाट्य परिषदेच्या बैठकीसाठी शरद पवार यांना भेटायला गेलो होतो. अशी माहिती उदय सामंत यांनी भेटीनंतर बाहेर माध्यमांशी बोलताना दिली. पण या दरम्यान रिफायनरी संदर्भात देखील चर्चा झाली झाली. काल राजापूर मध्ये सुरु असेलेल्या आंदोलनासाठी शरद पवार यांनी उदय सामंत यांना फोन केला होता. त्यामुळे  सध्याच्या परिस्थिती बाबत शरद पवार यांनी त्याची माहिती दिली आहे.  अशी माहिती त्यांनी दिली.

शरद पवार यांनी भूमिका मांडली होती की स्थानिक लोकांशी संवाद साधून हा प्रश्न सोडवायला हवा. तीच भूमिका आमची देखील आहे. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल, ते मुख्यंमत्री असताना अनेक प्रकल्पांना जागा दिल्या गेल्या आहेत. आम्ही नक्कीच त्यांचं मार्गदर्शन घेऊ. अशी भूमिका देखील सामंत यांनी यावेळी मांडली.

Barsu Refinery : टोपी उड सकती है! फडणवीसांनी आम्हाला डिवचू नये राऊतांचा हल्लाबोल

राजन साळवी यांचे आभार

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी मात्र शासनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यावर बोलताना उदय सामंत यांनी राजन साळवी यांचे आभार मानले. ते म्हणले की राजन साळवी यांची जी भूमिका आहे, तीच भूमिका सरकारची आहे. सध्या जे माध्यमांत दाखवले जात आहे की जिल्हाधिकरी आणि पोलीस दंडुकेशाही करत आहे, तशी परिस्थिती तिथे नाही. सरकार त्या आंदोलकांशी संवाद करत आहे.

राज ठाकरे यांची भेट घेणार

याशिवाय उदय सामंत हे राज ठाकरे यांची भेट घेतली जाणार आहे. त्यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यांची वेळ मिळाली की त्यांची भेट घेईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.

Radhakrishna Vikhe Patil : किसान सभेचा मोर्चा निघाला, विखेंच्या कार्यालयावर धडकणार ‘लाल वादळ’

Tags

follow us