Barsu Refinery : टोपी उड सकती है! फडणवीसांनी आम्हाला डिवचू नये राऊतांचा हल्लाबोल

Barsu Refinery : टोपी उड सकती है! फडणवीसांनी आम्हाला डिवचू नये राऊतांचा हल्लाबोल

Shiv Sena will take the first bullet in its chest : कोकणातील रिफायनरी प्रकल्पाच्या (Refinery Project) कामाला सुरूवात झाली. मात्र, या प्रकल्पावरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांसह ठाकरे गटानेही बारसूतील सर्वेक्षण त्वरित थांबवण्याची मागणी करत शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही सुपारी कुणाकडून घेतली, अशी टीका ठाकरे गटावर केली होती. त्यांच्या या टीकेला आता ठाकरे गटाचे खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधतांना सांगितले की, भाजप आणि शिंदे गट हे सुपारी घेऊन बोलतात. त्यांनी असं सुपारी घेऊन बोलू नये. महाराष्ट्रात कधी शिवनसेना सुपारी घेण्याची गरज पडली नाही. शिवसेना फोडण्याची, शिवसेना संपवण्याची निवडणूक आयोगापासून केंद्रीय तपाय यंत्रणापर्यंत सुपारी घेऊन कोण काम घेतं? हिंमत असेल तर समोर या. अशा सुपारी घेऊन आमच्यावर हल्ले करू नका. आम्ही फडणीसांचा सन्मान करतो. पण त्यांनी आम्हाला डिवचू नये. लोक आमच्याबरोबर आहेत. आम्ही तुमच्या विरोधात लोकांसोबत लढू, असं राऊतांनी ठणकावलं.

Karnataka Elections : मुलगा आजारी, पिता मैदानात ! नव्वदीतही माजी पंतप्रधानांचा तुफान प्रचार

राऊत म्हणाले की, बारसूमधील स्थानिकांना हा रिफायनरी प्रकल्प नको असेल तर आम्ही हा प्रकल्प होऊच देणार नाही. लोक या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी छातीवर गोळ्या झेलायला तयार असतील, तर पहिली गोळी शिवसेना आपल्या छातीवर झेलेल, असं राऊत म्हणाले.

उदय सामंत यांनी सांगितले होते की, उद्धव ठाकरे यांनी सीएम असतांना त्यांनीच या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल दिला होता. मात्र, आता ठाकरे गट बारसू प्रकल्पाला विरोध करून जनतेला फक्त आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं भासवत आहे. सामंतांच्या या टीकेचाही राऊतांनी चांगलाच समाचार घेतला. राऊत म्हणाले की, नाणारमध्ये प्रकल्प होणार होता. त्याविरोधात आंदोलन झालं. त्यामुळं हा प्रकल्प नाणार मध्ये होऊ शकला नाही. त्यानंतर बारसूची जागा निश्चित झाली. ती ओसाड जमीन होती. उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतचा निर्णय घेतला होता. पण आज जर लोक या प्रकल्पाला विरोध असेल तर आम्ही जनतेच्या बरोबर आहोत. बारसूबाबत शिवसेनेने अजिबात दुटप्पी भूमिका घेतलेली नाही. लोकांचा विरोध असेल तर शिवसेना त्याला पाठिंबा देणार नाही, असं सांगितलं.

राऊत म्हणाले, आम्ही उद्योगाचे शत्रू नाही. कारण, उद्योग धंदे आले तर तर रोजगार वाढेल ही शिवसेनेची भूमिका होती. आणि आजही हीच भूमिका आहे. पण प्रश्न असा आहे की, अनेक उद्योग हे बाहेर गेले, फॉस्कॉन वेदांत का बाहेर गेला? त्यावर उद्योग मंत्र्यांनी बोलावं, असं सांगत हवा बहोत तेज चल रही है, टोपी उड जायेगी आपकी. ध्यान मे रखना, असा इशारा दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube