Karnataka Elections : मुलगा आजारी, पिता मैदानात ! नव्वदीतही माजी पंतप्रधानांचा तुफान प्रचार

Karnataka Elections : मुलगा आजारी, पिता मैदानात ! नव्वदीतही माजी पंतप्रधानांचा तुफान प्रचार

Karnataka Elections : कर्नाटकात निवडणुकीचा (Karnataka Elections) प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपला सत्तेतून बेदखल करण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेससह जेडीएस भाजपवर तुफान हल्ले चढवत आहे. आता विरोधकांच्या हल्ल्यातील धार अधिक वाढविण्यासाठी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (H. D. Deve Gowda) मैदानात उतरले आहे. देवेगौडा 90 वर्षांचे असतानाही त्यांनी वयाचा विचार न करता प्रचाराच्या मैदानात शड्डू ठोकला आहे.

देवेगौडा यांना नीट चालताही येत नसताना सुरक्षारकक्षकांच्या मदतीने ते मंचावर येतात. खाली उतरण्यासाठी रॅम्प्स तयार केले जातात. मात्र, ज्यावेळी त्यांच्या हातात माईक असतो त्यावेळी विरोधकांवर तुटून पडणारा त्यांचा आवेश वाक्यावाक्यात जाणवतो. रणरणत्या उन्हात लाही लाही होत असतानाही सभेत त्यांचा आवाज घुमत असतो.

देवेगौडा यांचे पुत्र एचडी कुमारस्वामी (वय 63) यांना निवडणुकीतील प्रचारामुळे थकवा जाणवू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर देवेगौडा यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेतल्याचे बोलले जात आहे.

Gulabrao Patil : संजय राऊत चुकीचे कंडक्टर; पुढे रेड झोन, उद्धव साहेबांना सावध केलं होतं

सोमवारी पहिल्याच दिवशी त्यांनी तुमकुरू जिल्ह्याच्या सिरा तालुक्यापर्यंत हेलिकॉप्टरने प्रवास केला. तुमकुरू जिल्ह्यात 1994 रोजी झालेल्या निवडणुकीत जेडीएसने 11 जागा जिंकल्या होत्या. याठिकाणी जेडीएसला पुन्हा नागरिक साथ देतील असा अंदाज आहे. देवेगौडा कर्नाटकातील वोक्कलिगा समुदायाचे सर्वात मोठे नेते मानले जातात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आता ही ओळख मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

प्रचाराच्या निमित्ताने देवेगौडा यांचा प्रवास सुरू आहे. प्रचार सभेत ते आपल्या वयाचा उल्लेख करत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्नही करतात. मी 90 वर्षांच्या वयातही प्रचारासाठी बाहेर पडलो आहे. 10 मे रोजी मतदान होत आहे. मी 8 मेच्या संध्याकाळपर्यंत काम करत राहणार आहे, असे भाषण त्यांनी कोराटगेरे येथे सभेत केले.

Karnataka Election : राजकीय गणितं बदलणार?; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये दाखल

तिसरी पिढी राजकारणात 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजपने सत्ता कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसरीकडे काँग्रेसही जोरदार टक्कर देताना दिसत आहे. मात्र कर्नाटक निवडणुकीत यंदा घराणेशाहीचेही राजकारण पहायला मिळत आहे.

जेडीएस प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांची तिसरी पिढी रिंगणात आहे. माजी पंतप्रधान आणि जीडीएस प्रमुख देवेगौडा यांनी त्यांचा नातू निखिलला एबी फॉर्म दिला आहे. त्यांनी नातवाला आशीर्वाद दिला. निखिल कुमारस्वामी (Nikhil Kumar Swamy) यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जेडीएस प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू निखिल कुमारस्वामी हे रामनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube