Radhakrishna Vikhe Patil : किसान सभेचा मोर्चा निघाला, विखेंच्या कार्यालयावर धडकणार ‘लाल वादळ’

Radhakrishna Vikhe Patil : किसान सभेचा मोर्चा निघाला, विखेंच्या कार्यालयावर धडकणार ‘लाल वादळ’

Kisan sabha ‘Long March’ from Akole to Loni : सध्या शेतकऱ्यांना (farmer) विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळं (Unseasonal rain) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायराण जमिनीचा प्रश्न, दुग्ध धोरण या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.

सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या (Kisan Sabha) पुढाकाराने मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध मागण्यांसाठी आज 26 एप्रिल ते 28 एप्रिल 2023 या काळात अकोले ते लोणी असा जबरदस्त राज्यव्यापी पायी मोर्चा (march) निघाला आहे. राज्यातील अनेक शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत.

अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना, तसेच शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय या समविचारी संघटनांचा या मार्चात सहभाग आहे. हा मोर्चा तीन दिवस पायी चालून, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रुपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलन करून तीव्र देणार जाणार असल्याचा इशारा देखील किसान सभेनं दिला आहे.

राज्यातील मागील दोन हंगामात अतिवृष्टीनं शेती पिकांच मोठं नुकासान झालं आहे. सरकारनं या पिकांना नुकसानभरपाई देण्याच्या मोठ्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र, अद्याप कुठलीही मदत करण्यात आली नाही. दुध, कापूस, सोयाबीन, हिरडा, तुर, हरभरा पिकांना रास्त भावाची हमी देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येणार आहे.

Sanjay Raut : आम्ही रिफायनरी प्रकल्पाविरोधात लोकांसोबत, शिवसेना छातीवर गोळ्या झेलायला तयार

दुग्धपदार्थ आयात करून दुधाचे भाव पाडण्यास विरोध आहे. जमीन अधिग्रहणास योग्य मोबादला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना आणि निराधरांना पेंशन, सर्वांना घरकुले, कर्ज आणि वीजबिल माफी, शेतीला सिंचनासाठी धरणांचे पाणी, बांधकाम कामगारांना मेडिक्लेम द्यावा, अशा मागण्याही करण्यात येणार आहेत.

पायी मोर्चा मार्ग-
दिनांक 26 एप्रिल
अकोले बाजार तळ ते रामेश्वर मंदिर परिसर, धांदरफळ, ता. – संगमनेर – 12 किलोमीटर

दिनांक 27 एप्रिल सकाळी
रामेश्वर मंदिर परिसर,, धांदरफळ ते खतोडे लॉन्स -12 किलोमीटर

दिनांक 27 एप्रिल दुपारी
खतोडे लॉन्स ते जनता महाविद्यालय, वडगाव पान – 9.6 किलोमीटर

दिनांक 28 एप्रिल सकाळी
वडगाव पान ते समृध्दी लॉन्स, निमगाव जाळी 11 किलोमीटर

दिनांक 28 एप्रिल दुपारी
समृध्दी लॉन्स, निमगाव जाळी ते लोणी – 10 किलोमीटर

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube