Ladki Bahin Yojana Aditi Tatkare Big Announcement : लाडक्या बहिणींना महिला दिनाची मोठी भेट सरकारकडून दिली जात आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी 3000 रुपये जमा करण्यात येईल, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी (Aditi Tatkare) दिली आहे.
लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट !
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे.
७ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी ३००० रुपये जमा… pic.twitter.com/37HlfDfPWF
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) March 4, 2025
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 7 मार्च रोजी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्यांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दोन महिन्यांचा सन्माननिधी खात्यात जमा होणार आहे. सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा केले जाणार आहेत, असं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.
प्रसिद्ध अभिनेत्रीने केली 15 किलो सोन्याची तस्करी, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती आणि महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवणार, असं आश्वासन दिलं होतं. आता निवडणूक संपून सरकार स्थापन झालंय, तरी देखील योजनेचा हप्ता वाढवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. दरम्यान आता कालपासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय. या अधिवेशनात यासंदर्भात निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर कदाचित महिलांना दर महिन्याला योजनेचा हप्ता 2100 रूपये दिला जातोय.
धनंजय मुंडेंनी माझ्यावर आवाज वाढवला होता; ‘त्या’ भेटीचा उल्लेख करत धसांनी काय सांगितलं?
राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांची मदत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असते. याचाच एक भाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. 2024 मध्ये जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरू केली होती. आतापर्यंत योजनेचे सात हप्ते लाभार्थी महिलांना मिळत आहेत. फेब्रुवारी महिना संपला तरी महिलांना अजून योजनेचा आठवा हप्ता मिळालेला नाहीये. त्यामुळे पैसे खात्यात केव्हा जमा होणार? याकडे राज्यातील सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे.