New rules for Ladki Bhain Yojana : लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थ्यांना लाभ सोडण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय. आतापर्यंत साडे पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. (Ladki Bhain) दरम्यान, सरकारकडून आता नवे नियम लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना मिळाले 450 कोटी; धक्कादायक माहिती उघड..
लाडकी बहीण योजनेचा हफ्ता आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला दिला जाणार आहे. तर अडीच ला
खांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. लाडक्या बहिणींना योजनेचा हफ्ता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दिला जाणार आहे. मात्र लाडक्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्याच लाभ मिळणार नाही.
ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासलं जाणार आहे. दरवर्षी जून महिन्यात ई केवायसी करावी लागणार आहे. उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समजते.
अजित पवार काय म्हणाले ?
शेतकाम करणारी महिला, धुणीभांडी करणारी महिला, स्वयंपाक करणारी महिला, गरीब महिला, भाजी विकणारी महिला यांच्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. ज्या महिलांचं महिन्याचं उत्पन्न हे वीस हजार रुपये आहे, अशा महिला या योजनेसाठी पात्र आहेत. ज्या महिलांना इतर कुठलाच लाभ मिळत नाही, अशा महिलांसाठी ही योजना आहे. आधी अशी चर्चा सुरू होती, की ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे त्यांना दोनच अपत्य असावीत. मात्र नंतर असं लक्षात आलं, ज्या महिलांचा पगार हा चाळीस हजार रुपये आहे, घरी चारचाकी गाडी आहे, अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र आता जो लाभ दिला आहे, तो परत घेणार नाही. भाऊबीज, राखी पौर्णिमा भेट परत घेण्याची संस्कृती आपली नाही. काही महिलांनी नावं मागे घेतली आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
नवे नियम –
दरवर्षी जून ते जुलै मध्ये ई केवायसी करणं अनिवार्य
लाभार्थी हयात आहे की नाही याचीही तपासणी होणार
अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही
लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासण्यात येणार
जिल्हा स्तरावरून फेरतपासणी करून त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे.