Download App

ड्रायव्हर बनला जमीनदार! खासदार संदिपान भूमरेंच्या अडचणींत वाढ,आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

Land gift worth 150 crores To MP Sandipan Bhumre driver : खासदार संदिपान भुमरे यांचा ड्रायव्हर 150 कोटींच्या जमिनीमुळे अडचणीत आला आहे. शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे (MP Sandipan Bhumre) यांच्या ड्रायव्हरला हैद्राबादच्या सालारजंग कुटुंबातील वारसदाराकडून (Chhatrapati Sambhajinagar) 150 कोटींची जागा गिफ्ट मिळाली आहे. ही जागा संदिपान भुमरेंच्या ड्रायव्हरला गिफ्ट कशी मिळाली? याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?

आर्थिक गुन्हे शाखा खासदार संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरची चौकशी केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील दाऊदपुरा परिसरातील 150 कोटींच्या तीन एकर जागेची चौकशी सुरू आहे. ही तीन एकर जागा मूळ हैद्राबादच्या सालारजंग कुटुंबाची होती. सालारजंग कुटुंब हे हैद्राबादच्या निजामाच्या सेवेत होतं. या कुटुंबाची 150 कोटींची जागा भुमरेंच्या ड्रायव्हरला गिफ्ट म्हणून देण्यात आली आहे.

वणवा पेटण्यास सुरूवात, राजसाहेबांचा विजय असो; हिंदी सक्तीविरोधात भाजपात पहिला राजीनामा

जावेद शेख असं भुमरेंच्या ड्रायव्हरचं नाव आहे. तो मागील 12 ते 13 वर्षांपासून खासदार संदिपान भुमरे यांच्या सेवेत आहे. साधारण ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीला दिडशे कोटींची जागा भेट म्हणून कशी मिळाली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून संशय देखील निर्माण झालाय. भुमरेंच्या ड्रायव्हरविरोधात वकील मुजाहिद खान यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली आहे. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या ड्रायव्हरची चौकशी सुरू केली आहे.

मातोश्री-शिवतीर्थावर काय आणि कसं घडलं? राऊतांनी सांगितली पडद्यामागची मनोमिलनाची स्टोरी

खासदार भुमरे यांची प्रतिक्रिया काय?

याप्रकरणी खासदार भुमरे यांनी ड्रायव्हरच्या व्यवहाराशी संबंध नाही, असं स्पष्ट केलं आहे. एक साधा ड्रायव्हर, ज्याला पंचवीस हजार पगा असेल. त्याला सालारजंग एवढी प्रॉपर्टी ड्रायव्हरला भेट देत असतील, तर चौकशी व्हायला हवी असं म्हटलेलं आहे. याप्रकरणी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे आणि चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करत आहे. ड्रायव्हरच्या जमिनीमुळे आता भुमरेंच्या अडचणी वाढणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

follow us