मातोश्री-शिवतीर्थावर काय आणि कसं घडलं? राऊतांनी सांगितली पडद्यामागची मनोमिलनाची स्टोरी

हिंदी भाषा सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा निघणार असून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची स्टोरी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी सांगितलीयं.

Raj Thackeray

Udhav Thackeray & Raj Thackeray Alliance : हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरुन सध्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राज्य सरकारकडून आधी हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेण्यात आला. राजकीय वर्तुळातून विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय मागे घेत तिसऱ्या भाषेचा पर्याय दिला. या संपूर्ण घडामोडीनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेत येत्या 5 जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर या मोर्चात ठाकरे गटही सामिल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. अखेर आज संजय राऊतांनी (Sanjay Raut) या वृत्ताला दुजोरा देत दोन्ही ठाकरेंचा मोर्चा एकत्रित निघणार असल्याचं ट्विटच्या माध्यमातून क्लिअर केलं. आता मातोश्री-शिवतीर्थावर काय आणि कसं घडलं? याबाबत संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या पडद्यामागची स्टोरी सांगितलीयं.

राज्यात नव्या शैक्षणिक धोरणानुसार हिंदी भाषा शक्तीचा विषय सुरु आहे. मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझं लादलं जात आहे, हे ओझं मुलांना पेलवलवणार नसल्याचं भाषा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यात आता राजकीय नेत्यांकडूनही हिंदी भाषेसह तिसऱ्या भाषेचा पर्यायाला कडाडून विरोध केला जातोयं. आमचा हिंदी भाषेला विरोध नसून शिक्षणात अशा प्रकारची जबरदस्ती करता येणार नसल्याचं संजय राऊतांनी ठामपणे सांगितलंय.

झी टॉकीजचा हँडलूम कॅन्टर यंदाच्या वारीत सज्ज,महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते झाला शुभारंभ!

राज्यात हिंदी भाषा सक्तीची न होण्यासाठी राज्यातल्या अनेक भाषिक संस्थात एकत्रितपणे काम करत आहेत. मराठी भाषा संस्थाचे दीपक पवार यांच्यासह इतर भाषा तज्ज्ञांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. येत्या 7 तारखेला मराठी भाषा कृतीसमितीसह सर्वच मराठी कलाकारांना निमंत्रित करण्यात आलंय. मराठीचा विषय असल्याने उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवत मराठी भाषा कृतीसमितीला पाठिंबा दिला असल्याचंही राऊत यांनी सांगितलंय.

शिंदेंच्या’मार्गां’ची अजित पवारांकडून कोंडी? महायुती सरकारमध्ये शह-काटशहाचं राजकारण

राज ठाकरेंनी स्वत: फोन करुन सांगितलं….
आम्ही पत्रकार परिषेदेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांचा आम्हाला फोन आला. मराठी भाषेसाठी दोन वेगवेगळे मोर्चे काढण्यापेक्षा आपण एकत्रित मोर्चा काढू, त्याचा अधिक प्रभाव पडेल. मराठी भाषिकांना त्याचा आनंदही होईल, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

राज ठाकरे यांच्या फोननंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान, उद्धव ठाकेर यांनी मी महाराष्ट्राच्या मनात जे काही असेल ते करणार असल्याचं स्पष्ट केलं. काल झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी समन्वयाची भूमिका घेतली आहे. 5 तारखेला दोन्ही ठाकरेंचं एकत्रितपणे आंदोलन होणार आहे. दोन्ही ठाकरे सध्या मनाने एकत्र आलेले आहेत. या मोर्चाला आम्ही सर्वांनाच सोबत घेऊन येणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय.

उदय सामंतांच्या शिकवणीची आम्हाला गरज नाही…
राज्यातील विद्यार्थ्यांनी अधिकाधिक भाषा शिकल्या पाहिजे, आम्हाला पाच ते सहा भाषा येतात. उदय सामंत यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही, त्यांनी जरा डोकं ठिकाणावर ठेऊन बोलावं, हा विषय सक्तीचा असल्याची टीका संजय राऊत यांनी उदय सामंतांवर केलीयं.

follow us