Latur APMC Election मध्ये देशमुखांचा बोलबाला, भाजपचा पत्ता झाला कट

Latur APMC Election Counting : कृषी उत्पन्न बाजार समित्या या ग्रामीण भागात राजकारणाचं महत्त्वाच्या मानल्या जातात. याच बाजार समित्यांच्या निवडणुका सध्या राज्यात सुरू आहेत यापैकी काही ठिकाणी मतदान आणि मतमोजणी देखील पार पाडली आहे. यामध्ये लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशमुखंचा बोलबाला आहे. कॉंग्रेसच्या कृषी विकास पॅनलचे सर्व 18 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. याठिकाणी […]

Amit And Dhiraj Deshmukh

Amit And Dhiraj Deshmukh

Latur APMC Election Counting : कृषी उत्पन्न बाजार समित्या या ग्रामीण भागात राजकारणाचं महत्त्वाच्या मानल्या जातात. याच बाजार समित्यांच्या निवडणुका सध्या राज्यात सुरू आहेत यापैकी काही ठिकाणी मतदान आणि मतमोजणी देखील पार पाडली आहे. यामध्ये लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशमुखंचा बोलबाला आहे. कॉंग्रेसच्या कृषी विकास पॅनलचे सर्व 18 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. याठिकाणी विलासराव देशमुखांचे चिरंजीव देशमुख बंधू आणि भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली.

मात्र या लढतीमध्ये कॉंग्रेसचा आणि देशमुख बंधुंचा बोलबाला राहिल्याचं पाहायाला मिळालं. तर भाजपला मात्र दारूण पराभवाला सामेर जावं लागलं आहे. कारण कॉंग्रेसच्या कृषी विकास पॅनलचे सर्व 18 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर भाजपच्या पॅनलचे सर्वचे सर्व 18 उमेदवार पराभूत झाले आहेत.

Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्याच्या कल कोणाकडे? कोण राखणार सत्ता

गेल्या वेळी देखील ही बाजार समिती देशमुखांच्याच ताब्यात होती. यावेळी देखील मतदारांनी पुन्हा एकदा देशमुखांवरच विश्वास दाखवला आहे. दुसरीकडे आज राज्यातील 95 बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. त्यातील 34 बाजार समित्यांची कालच मतमोजणी झाली आहे. त्याच बरोबर काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज देखील मतदान होणार आहे.

Exit mobile version