Laxman Hake : मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) २९ तारखेपासून मुंबईमध्ये (Mumbai) आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यापूर्वी सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, असं आवाहन जरांगेंनी केलं. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनीही त्याच दिवशी आंदोलनाचा इशारा दिला. तसेच त्यांनी जरांगेवर जोरदार टीका केली. जरांगेंचा हा येडपट अन् खुळचट माणूस आहे, फडणवीसांना त्यांचा बंदोबस्त करावा, असं हाके म्हणाले.
Simhachalam Temple Accident : मंदिरात भाविकांवर भिंत कोसळली; 8 जणांचा दबून मृत्यू, 4 जण जखमी
ज्या दिवशी जरांगे उपोषणाला बसतील, त्याच दिवशी महाराष्ट्रातील ओबीसी मुंबईकडे निघणार असल्याचं हाके म्हणाले.
जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाला बसण्याची घोषणा केली. सरकारने यापूर्वी मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या इशाऱ्यानंतर हाकेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जरांगे पाटील हा अतिशय येडपट, खुळचट आणि बावळट माणूस आहे. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. त्याला उपचाराची गरज आहे. तो ओबीसींच्या आरक्षणावर उठला, तो घटनाद्रोही आहे. त्यामुळx जरांगेचा सरकारने लवकरात लवकर बंदोबस्त करावा. अन्यथा राज्यात अराजक निर्माण होईल, असं हाके म्हणाले.
ऑटो कंपन्यांना सवलत मिळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत, भारतासोबत चर्चा…
जरांगेंच्या सांगण्यावरून सरकारने शिंदे समितीच्या शिफारशी स्विकारल्या, तर आरक्षणाची चौकट उद्धवस्त होईल, असंही हाके म्हणाले.
ज्या दिवशी मनोज जरांगे उपोषणाला बसतील, त्याच दिवशी महाराष्ट्रातील ओबीसी समाज मुंबईकडे कुच करेल, आम्ही माळेगावाच्या खंडोबाला नारळ फोडून मुंबईच्या दिशेने लॉंग मार्चला सुरूवात करू. सरकारने त्यांना त्यांना फार महत्व न देता आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सत्तेची झूल बाजूला सारून ज्या माणसांना तुम्हाला निवडून दिलं, त्यांचा प्रश्न सभागृहात मांडला पाहिज, असे म्हणत हाकेंनी ओबीसी आमदारांवर टीका केली.
फडणवीसांनी उत्तर द्यावं…
एक-दोन नव्हे तर तब्बल ८ लाख कुणबी प्रमाणपत्रे वाटण्यात आली आहेत. यामुळे, ज्या ओबीसी जाती आजही अलिप्त आहेत, त्या आता राजकीय व्यवस्थेत दिसणार नाहीत. असे असेल तर ओबीसी आरक्षण कसे वाचेल? हे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं. दोन कोटी मराठे ओबीसी झालेत. त्यामुळं ओबीसींची घटनात्मक चौकट ओलांडली गेली आहे. फडणवीसांनी याचे उत्तर दिलं पाहिजे, असंही हाके म्हणाले.
जरांगे काय म्हणाले?
जरांगेंनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी २९ तारखेपासून मुंबईत उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. आमचे पुढचे आंदोलन मुंबईत असेल. २८ ऑगस्ट रोजी, राज्यभरातील मुले मला सोडण्यासाठी मुंबईत येतील. त्यानंतर २९ तारखेला ते शेतीच्या कामासाठी परततील. माझ्या मुलांना थोडासाही धक्का बसला तर कुणाचीही खैर राहणार नाही. मुंबईमध्ये मी शांततेत आंदोलन करणार आहे. सर्व मागण्यांची अंमलबजावणी २८ ऑगस्टपर्यंत पूर्ण झाली पाहिजेत. सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करावं. आमच्या संयमाचा अंत होत आहे. मंबईत जातांना मी दोनच गोष्टी घेऊन जाणार आहे. एक विजयाचा रथ आणि दुसरा अंत्ययात्रेचा रथ. दोन्ही पैकी एक रथ वापस येणार, हे फडणवीसांनी लक्षात ठेवावं, असा इशारा जरांगेंनी दिला.