ऑटो कंपन्यांना सवलत मिळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत, भारतासोबत चर्चा…

ऑटो कंपन्यांना सवलत मिळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत, भारतासोबत चर्चा…

Trump Optimistic On India Trade Deal Tariff Discount : पहलगाम हत्येनंतर देशात संतापाचं वातावरण कायम आहे. परंतु अशातच एक दिलासादायक बातमी देखील समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) दावा केला की, भारतासोबत टॅरिफ (Tariff) संदर्भात चर्चा चांगली सुरू आहे. ती अत्यंत चांगली प्रगती करत आहे. यामुळे ऑटो कंपन्यांना (auto companies) सवलत मिळू शकते, असा अंदाज आहे. ट्रम्प यांनी आशा व्यक्त केली आहे की, लवकरच दोन्ही देशांमध्ये करार होईल. मिशिगनमधील एका रॅलीपूर्वी ट्रम्प यांनी हे विधान केलंय.

नावाप्रमाणेच विवेक अन् आडनावाप्रमाणे आतून गोड, नांगरे पाटलांची फणसाळकरांसाठी खास पोस्ट

देशांतर्गत उत्पादनावर येणारा धोका लक्षात घेता, ट्रम्प ऑटोमोबाईल आणि त्याच्या सुटे भागांच्या उत्पादकांवरील आयात करावरील 25 टक्के शुल्कातून काही सूट देऊ शकतात. यामुळे भारतीय वाहन कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरं तर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑटो कंपन्या आणि वाहनांच्या सुटे भागांवर लादलेल्या 25 टक्के शुल्कांपैकी काही कमी करण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. हा एक मोठा बदल आहे, कारण आयातीवरील करामुळे भारतीय वाहन कंपन्यांना तोटा होण्याचा धोका होता.

Reshma Shinde : रेश्माचा केशरी रंगाच्या साडीतील क्यूट लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष…

भारत-अमेरिका व्यापार करार
यावर अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी म्हणाले की, भारतासोबत व्यापार कराराच्या चर्चा योग्य दिशेने सुरू आहेत. अमेरिकेसोबत व्यापार करार करणाऱ्या पहिल्या देशांपैकी भारत हा असू शकतो, असेही त्यांनी सूचित केले. यावर, वाहन उत्पादकांनी सांगितले की, आम्ही सूचित केले होते. या शुल्कांमुळे जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत अमेरिकेत किंमती वाढू शकतात, ज्यामुळे विक्री कमी होऊ शकते आणि अमेरिकेचे उत्पादन कमी होऊ शकते.

कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय ऑटो कंपन्या आणि ऑटो पार्ट्स उत्पादक कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. टॅरिफ वाढीच्या घोषणेनंतर भारतीय ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. या निर्णयापासून, ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube