Laxman Hake In Baramati : हा महाराष्ट्र आमचा आहे. आम्ही इथ बहुसंख्याक आहोत. आज महाराष्ट्रात काय सुरू आहे हे सगळे पाहतोय. आम्ही फार चांगल्या भाषेत बोलतो. मात्र, जो शिव्या देतो त्याला रेड कारपेट असतो. (Baramati) त्याच्या शिव्या मुख्यमंत्री ऐकतात. मात्र, एक लक्षात घ्या, मुख्यमंत्री हा एका जातीचा नसतो तो सबंध समाजाचा आसतो असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते बारामतीत ओबीसी बहुजन एल्गार मोर्चात बोलत होते.
पिढ्यापिढ्या आम्ही तुमची गुलामी केली. आम्ही अजित पवारांना मत दिली नाहीत का? आम्ही रोहित पवारांना मत दिली नाहीत का? मात्र, रोहित पवारच्या आयटी सेलने कुणाचं उदोउदो केलं जरांगे पाटलांचं, अजित पवारांचे आमदार कुणाला भेटले जरांगेंना? शरद पवारांचे खासदार कुणाला भेटले जरांगेंना, हे सगळ पाहिल्यावर असा प्रतिनिधी कुण्या जातीचा असतो का असा प्रश्नही हाके यांनी उपस्थित केला.
मोठी बातमी! जीआरच्या विरोधात ओबीसींमध्ये संतापाची लाट; लक्ष्मण हाके यांनी GR फाडला
आज ओबीसीमध्ये जे काही घटक आहेत त्यांची आजची काही स्थिती पाहा, साळी, माळी, कोळी, धनगर, हटकर वंजारी, बंजारी अशा घटकांचं मराठा समाजाला आरक्षण दिल्यावर काय होणार असा प्रश्न करत आता सर्व घटकांनी आपलं आरक्षण वाचवण्यासाठी सावध व्हाव अन्यथा आपला मोठा अधिकार हिसकावला जाई असंही हाके यावेळी म्हणाले आहेत.
नात्यागोत्याच्या पलिकडे कुठल्याही कारखान्याच्या पदाधिकाऱ्यालो होऊ दिलं नाही. कुटुंबाच्या बाहेर आमदारकी खासदारकी जाऊ दिली नाही. आज 400 संस्थांचे अध्यक्ष शरद पवार आहेत असाही थेट घणाघात हाके यांनी यावेळी केला आहे. त्याचबरोबर निवडणुकीच व्याकरण समजून वागणारे शरद पवार जर गावगाड्याच्या सर्व लोकांशी धरून वागले असते तर शरद पवार पंतप्रधान झाले असते.