मोठी बातमी, ओबीसी मोर्चाला परवानगी नाही, बारामती पोलिसांचा मोठा निर्णय

OBC Morcha Baramati : राज्यात सध्या आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामती पोलिसांनी मोठा निर्णय घेत लक्ष्मण हाके यांच्या मोर्चाची परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर ओबीसी मोर्च्याला परवानगी नाकारली आहे.
आज ओबीसी नेता लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा (OBC Morcha Baramati) काढण्यात येणार होता मात्र बारामती पोलिसांनी गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर ओबीसी मोर्च्याला परवानगी नाकारली आहे. तसेच आंदोलनासाठी पुढील तारीख घ्या अशी विनंती देखील पोलिसांनी आंदोलकांना केली असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे जेलमध्ये टाकलं तरी देखील आम्ही मोर्चा काढणारच अशी भूमिका ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांनी घेतली आहे.
माध्यमांशी बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आम्ही मोर्चा काढणार आहे. आम्ही कुठेही कायदा भंग केलेला नाही. आम्ही संविधानाच्या मार्गाने कायद्याच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. मात्र पोलिसांना परवानगी का नाकारली हे मला माहिती नाही असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले.
तर मुंबईपेक्षा बारामतीत गणेशोत्सव मोठा नाही. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं का? असा सवाल देखील हाके यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. तसेच मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाचा कसा नुकसान होत आहे याबाबत आम्हाला समाजाला माहिती द्याची आहे म्हणून आम्ही आज मोर्चा काढणार आहोत असेही लक्ष्मण हाके म्हणाले.
आम्ही ओबीसींसाठी रस्त्यावर लढाई लढणार
राज्याचे मंत्री छगन भूजबळ मंत्रिमंडळात आणि न्यायालयात ओबीसींसाठी लढाई लढणार आहे आम्ही ओबीसींसाठी रस्त्यावर लढाई लढणार आहोत. आम्ही ओबीसींना एकत्र आणणार आणि त्यांना समजून सांगणार. आम्ही फक्त सामाजिक भूमिका मांडत आहोत आमची कोणतीही राजकीय भूमिका नाही असं देखील माध्यमांशी बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले.
रॉस टेलर पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, 4 वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतणार पण न्युझीलंडकडून खेळणार नाही