Download App

इच्छाधारी नागाप्रमाणे भूमिका! लक्ष्मण हाकेंची शरद पवारांवर खोचक टीका

Laxman Hake Criticized Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी 9 ऑगस्ट 2025 रोजी नागपूरमध्ये हिरवा झेंडा दाखवून ओबीसी जनजागृतीसाठी ‘मंडल यात्रा’ सुरू केली. या यात्रेचा उद्देश ओबीसी (OBC Mandal Yatra) समाजाच्या हक्कांसाठी जनजागृती करणे, आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी मतदारांचे समर्थन मिळवायचे आहे. यात्रेची सुरुवात विदर्भातील 11 जिल्ह्यांपासून झाली असून, ती राज्यभरात पसरवण्याची योजना आहे. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी टीका केली.

‘इच्छाधारी नागा’प्रमाणे भूमिका बदलणारा नेता

या मंडल यात्रेवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र टीका केली आहे. त्यांनी शरद पवार यांना ‘इच्छाधारी नागा’प्रमाणे भूमिका बदलणारा नेता म्हणून संबोधले. हाके यांच्या म्हणण्यानुसार, शरद पवार हे ओबीसी समाजाच्या मुद्द्यांवर बोलत (Maharashtra Politics) असले तरी, त्यांच्या मागील कारभारात ओबीसी समाजाच्या हिताचे उल्लंघन झाले आहे. त्यांनी ओबीसी महामंडळांसाठी निधी मंजूर न केल्याचा आरोप केला आहे. हाके यांच्या या टीकेमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार दुप्पट वाहतूक भत्ता

शरद पवार यांच्या मंडल यात्रेची सुरुवात नागपूरमधून झाली असून, ती राज्यभरात पसरवण्याची योजना आहे. यात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लक्ष्मण हाके यांच्या टीकेमुळे या यात्रेच्या प्रभावीतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, शरद पवार यांची ही यात्रा भाजपच्या बालेकिल्ल्यातून सुरू केली गेली आहे. ज्यामुळे भाजपच्या ओबीसी मतदारांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. यात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या मुद्द्यांना प्रमुखता देण्याचा पवार यांचा प्रयत्न आगामी निवडणुकांमध्ये महत्त्वाचा ठरू शकतो.

मंडल यात्रेवर प्रश्नचिन्ह

लक्ष्मण हाके यांच्या टीकेमुळे शरद पवार यांच्या मंडल यात्रेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता पाहावे लागेल की, या यात्रेचा ओबीसी समाजाच्या राजकारणावर काय परिणाम होतो आणि आगामी निवडणुकांमध्ये त्याचा काय प्रभाव पडतो.

उत्पन्नात ‘तूट’ नव्हे ‘तोटा’, एसटी महामंडळाचा खुलाशातही कांगावा; श्रीरंग बरगेंची घणाघाती टीका

शरद पवार यांनी आता ओबीसींची झुल पांघरली आहे. नागपूरमधून मंडल यात्रा सुरु केलीय. इच्छाधारी नागाप्रमाणे भूमिका बदलण्यात शरद पवार पटाईत आहेत. मनोज जरांगेंना मांडीवर घेवून गोंजारनारे पवार अचानक ओबीसींची बाजू घेण्याच्या तयारीत आहेत, असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलंय. शरद पवारांची यात्रा म्हणजे ‘जखम मांडीला आणि मलम ‘दुसरीकडे कुठंतरी….’ अशी परिस्थिती आहे.

शरद पवार अँटी ओबीसीच

ओबीसींमध्ये फुट पडावी अन् जरांगेंचा मोर्चा यशस्वी व्हावा, या हेतूने शरद पवारांनी ही यात्रा काढली आहे. हा मोर्चा काढण्यासाठी कोणता ओबीसी नेता त्यांच्या दारात गेला होता? या प्रश्नांचं उत्तर देण्याची मागणी देखील हाकेंनी केली आहे. शरद पवार अँटी ओबीसीच आहे. पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांनी आपल्या सभा ओबीसी नेत्यांच्याच मतदारसंघात घेतल्या होत्या. ओबीसींसाठीच्या योजना, महामंडळं त्यांनीच बंद पाडली. ओबीसींसाठी स्वतंत्र महामंडळ देण्याची युतीची परंपरा पवारांनी खोडून काढली. स्वतःच्या कुटुंब – भावकीचं, पै पाहुण्याचं राजकारण टिकवण्यासाठी ओबीसी राजकारणाला संपवण्याचं काम पवारांनी केलं, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. शरद पवारांचं आजवरचं राजकारण फोडा आणि राज्य करा, असंच आहे अशी टीका देखील लक्ष्मण हाकेंनी केली आहे.

 

follow us